दुबई – भारतीय फलंदाजांची हाराकिरी आणि गोलंदाजांचा निष्प्रभ मारा यामुळे पाकिस्तानने भारतावर दणदणीत विजय मिळविला. टी२० विश्वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे संपूण जगाचे लक्ष लागून होते. तब्बल ५ वर्षांनी हे दोन्ही संघ आमने-सामने आले. भारताने दिलेल्या १५२ धावांचे आव्हान पाकिस्तानी सलामीवीरांनी अतिशय उत्तमरित्या पेलले. सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी शानदार खेळाचे प्रदर्शन केले. दोघांनीही अर्धशतक झळकावले. पाकिस्तानने एकही गडी न गमावता १० गडी राखून भारतावर दणदणीत विजय मिळविला. १८व्या षटकातच पाकिस्तानने लक्ष्य पार केले.
विराटची अर्धशतकी खेळी
सामन्याच्या प्रारंभीच पाकिस्तानने टॉस जिंकला आणि सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर भारताचे आघाडीचे फलंदाज रोहित शर्मा आणि लोकेश राहुल हे मैदानात उतरले. मात्र, भारताची धावसंख्या अवघी ३ असताना पहिला धक्का बसला. रोहित शर्मा शून्यावरच बाद झाला. शाहिन अफ्रिदीने त्याला पायचित केले. पहिल्याच षटकात रोहित शर्माला बाद केल्याने पाकिस्तानी खेळाडूंनी मोठा जल्लोष केला. आता कर्णधार विराट कोहली मैदानात आला. तिसऱ्याच षटकात शाहीन अफ्रिदीने लोकेश राहुलला त्रिफळाचित केले. त्यामुळे अवघ्या ३ षटकातच भारताचे आघाडीचे फलंदाज तंबूत गेले आहेत. सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांनी चांगला खेळ सुरू केला पण सूर्यकुमार ११ धावांवर बाद झाला. हसन अलीच्या चेंडूवर मोहम्मद रिझवानने झेल घेतला. कर्णधार विराट कोहली याने शानदार अर्धशतक केले. एकामागोमाग फलंदाज बाद होत असताना विराटने भारतीय संघाला सावरले. त्यामुळेच भारताला किमान १५० धावा तरी करता आल्या.
धावफलक असा
पाकिस्तानः १५२/० ओव्हर १७.५
बाबर आझम – नाबाद – ६८
मोहम्मद रिझवान – नाबाद – ७९
—
(गोलंदाज आणि गडी बाद)
भुवनेश्वर कुमार – ०
मोहम्मद शामी – ०
जसप्रीत बुमराह – ०
वरुण चक्रवर्ती – ०
भारतः १५१/७ ओव्हर २०
लोकेश राहुल – त्रिफळाचित – शाहीन अफ्रिदी – ३
रोहित शर्मा – पायचित – शाहीन अफ्रिदी – ०
विराट कोहली – झेलबाद – शाहीन अफ्रिदी – ५७
सूर्यकुमार यादव – झेलबाद – असन अली – ११
ऋषभ पंत – झेलबाद – शादाब खान – ३९
रविंद्र जडेजा – झेलबाद – हसन अली – १३
हार्दिक पांडया – झेलबाद – हारिस राऊफ – ११
भुवनेश्वर कुमार – नाबाद – ५
मोहम्मद शामी – नाबाद – ०
—
(गोलंदाज आणि गडी बाद)
शाहीन अफ्रिदी – ३
हसन अली – २
इमाद वासीम – ०
शादाब खान – १
मोहम्मद हाफीज – ०
हारीस रौफ – १