आबुधाबी – टी २० विश्वचषक स्पर्धेत भारताने अफगाणिस्तान विरुध्द सामन्यात शानदार विजय मिळवला. दोन पराभवानंतर मिळवलेल्या या विजयामुळे भारताच्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत आशा पल्लवीत झाल्या आहे. टॅास हारल्यामुळे भारतााल प्रथम फलंदाजी मिळाली होती. त्यात भारतीय संघाने दोन विकेट देत २१० धावा केल्या. तर अफगाणिस्ताने सात विकेट देत १४४ धावा केल्या. त्यामुळे भारताने ६६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात सामनावीर रोहित शर्मा ठरला.
अगोदर पराभव झालेल्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाविरुद्धच्या सामन्यात भारत टॉस हरला होता. त्यामुळे या दोन्ही वेळेस भारताला सर्वप्रथम फलंदाजी करावी लागली आणि त्यानंतर पराभवही पत्करावा लागला. आजही भारत टॉस हरला. त्यामुळे अफगाणिस्तानने सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर के एल राहूल आणि रोहित शर्मा हे मैदानावर उतरले. गेल्या दोन सामन्यात हे दोन्ही फलंदाज सपशेल अपयशी ठरले. तसेच, भारताचे फलंदाज एकामागोमाग एक तंबूत परतले होते. मात्र, आज भारतीय फलंदाजांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. त्यामुळेच भारताने धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात अफगाणिस्तान समोर विजयासाठी २११ धावांचे आव्हान ठेवले. अफगाणिस्तान ते पूर्ण करण्याचा चांगला प्रयत्न केला. पण, त्यांचा संघ २० ओव्हरमध्ये.१४४ धावावरच गारद झाला.
भारताच धावफलक असा
भारत – २१०/२ ओव्हर – ३
रोहित शर्मा – ७४
के एल राहुल – ६९
ऋषभ पंत – २७
हार्दिक पांड्या – ३५