दुबई – टी२० विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध स्कॉटलंड या सामन्याला प्रारंभ झाला आहे. यापूर्वीच्या दोन सामन्यांमध्ये भारत पराभूत झाला आहे. तर, एक सामना भारताने जिंकला आहे. उपांत्य फेरीत जाण्यासाठी भारताला स्कॉटलंड विरुद्ध मोठ्या फरकाने विजय हवा आहे. गेल्या तीन सामन्यात भारताला टॉस जिंकता आला नव्हता. त्यामुळे तिन्ही वेळी भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली होती. आज मात्र भारताने टॉस जिंकला. त्यामुळेच भारताने सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
स्कॉटलंडचा संघ मैदानात उतरला पण तो पत्त्यासारखा कोसळला. त्यामुळेच संपूर्ण संघ अवघ्या १७ षटकातच गारद झाला. शमी आणि जडेजाच्या भेदक माऱ्यापुढे संघाला केवळ ८५ धावाच करता आल्या. त्यामुळे विजयासाठी भारतासमोर ८६ धावांचे आव्हान होते.
भारताची सुरुवात एकदम जोरदार झाली. के एल राहूल आणि रोहित शर्मा यांनी जोरदार फलंदाजी केली. मात्र, दोघेही बंद झाले. राहूलने अर्धशतकी खेळी केली. तर रोहित शर्माने ३० धावा केल्या. भारताने ७व्या षटकातच विजय प्राप्त केला.
धावफलक असा
स्कॉटलंड – ८५/१० ओव्हर-१७
रविंद्र जडेजा – ३
मोहम्मद शमी – ३
जसप्रीत बुमराह – २
आर अश्विन – १
भारत – ८९/२ ओव्हर – ६.३
रोहित शर्मा – ३०
के एल राहुल – ५०
विराट कोहली – २
सूर्यकुमार यादव – ६
दरम्यान, भारताला उपांत्य फेरीत दाखल व्हायचे असेल तर स्कॉटलंडच्या फलंदाजांना १०० धावांच्या आत गुंडाळणे आणि तसेच, हे लक्ष्य भारताला १२ षटकांच्या आत पूर्ण करणे आवश्यक होते. ते भारताने केले आहे. त्यामुळे भारताचे पारडे जड झाले आहे. आता यापुढील सामनाही भारताला मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक आहे.