इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – T20 विश्वचषक सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. ही मेगा स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पर्धेची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी T20 विश्वचषकासाठी एकूण ५.६ दशलक्ष डॉलर बक्षीस रक्कम ठेवण्यात आली आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम सुमारे ४५.६७ कोटी आहे. यामध्ये, विजेत्या संघाला सर्वाधिक १३ कोटी मिळतील, तर अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला सुमारे ६.५ कोटी मिळतील.
ICC ने जाहीर केले आहे की १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्न येथे ICC पुरुष T20 विश्वचषकाच्या विजेत्या संघाला १.६ दशलक्ष डॉलर बक्षीस रक्कम दिली जाईल, तर उपविजेत्या संघाला मूळ रक्कम दिली जाईल. १६ संघांमध्ये एक महिना चालणाऱ्या या स्पर्धेच्या शेवटी, उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघासाठी ४ लाख अमेरिकन डॉलर निश्चित करण्यात आले आहेत. त्याचवेळी, सुपर १२ मधून बाहेर पडलेल्या ८ संघांमधील प्रत्येक संघाला ७ हजार अमेरिकन डॉलर्स दिले जातील.
ICC टी-20 विश्वचषक हा १६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. पहिल्या फेरीत वेस्ट इंडिज, श्रीलंकेसह एकूण ८ संघ भाग घेणार आहेत. यापैकी ४ संघ सुपर १२ साठी पात्र ठरतील. गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्याने २२ ऑक्टोबर रोजी सुपर १२ ची सुरुवात होईल. टीम इंडिया २३ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.
टी20 विश्वचषक २०० बक्षीसे अशी
विजेता – $१.६ दशलक्ष (अंदाजे रु. १३ कोटी)
उपविजेता – $०.८ दशलक्ष (अंदाजे ६.५ कोटी)
उपांत्य फेरीत पराभूत झालेले संघ – $०.४ मिलियन (अंदाजे ३.२६ कोटी)
सुपर १२ मध्ये प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला – ४० हजार डॉलर (अंदाजे ३३.६२ लाख)
सुपर १२ मधून बाहेर पडलेला प्रत्येक संघ – ७० हजार डॉलर (सुमारे ५७.०९ लाख)
पहिल्या फेरीत प्रत्येक सामना जिंकणारा संघ – ४० हजार डॉलर्स (अंदाजे ३३.६२ लाख रुपये)
पहिल्या फेरीतून बाहेर पडणारा प्रत्येक संघ – ४० हजार डॉलर्स (अंदाजे ३३.६२ लाख रुपये)
The prize pot for the 2022 #T20WorldCup in Australia has been revealed ?
Full details ?https://t.co/Vl507PynsJ
— ICC (@ICC) September 30, 2022
T20 World Cup ICC Declare Prize Money Cricket Australia