मुंबई – येत्या १७ ऑक्टोबरपासून टी२० वर्ल्डकप सुरू होत आहे. याचसंदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) मोठी घोषणा केली आहे. टी२० वर्ल्ड कप २०२१च्या पुरस्कारांबाबत ही घोषणा आहे. वर्ल्डकप जिंकणाऱ्या विजेत्या संघाला तब्बल १२ कोटी रुपयांच्या पुरस्काराची रक्कम मिळणार आहे. तर, उपविजेत्या म्हणजेच अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला ६ कोटी रुपये मिळणार आहे. उपांत्य फेरी (सेमिफायनल) मध्ये पराभव होणाऱ्या संघांना प्रत्येकी ३ कोटी रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. सुपर १२मध्ये असणाऱ्या संघांना एक बोनसही दिला जाणार आहे.









