दुबई – टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव करत विश्वचषक पटकावला. न्यूझीलंडने दिलेले १७१ धावाचे आव्हान ऑस्ट्रेलियाने २ फलंदाज गमावत पूर्ण केले. या अंतिम सामन्यात १७३ धावांचे आव्हान घेऊन ऑस्ट्रेलियन फलंदाज मैदानात उतरले. मात्र, फिंच हा ५ धावांवरच बाद झाला. त्यानंतर वॉर्नर आणि मार्श यांनी डाव सावरत जोरदार फलंदाजी केली.
न्यूझीलंडच्या संघाने सर्वप्रथम फलंदाजी सुरू केली. त्यांची पहिली विकेट लवकरच पडली. मिशेल ११ धावात परतला. त्यानंतर गुप्टील आणि विल्यमसन यांनी चांगली भागीदारी केली. त्यानंतर गुप्टील बाद झाला. विल्यमसन याने सर्वाधिक ८५ धावा केल्या. तर हॅझलवूडने सर्वाधिक ३ बळी टिपले. न्यूझीलंडने ४ गड्यांच्या मोबदल्यात १७२ धावा केल्या. आणि ञस्ट्रेलियासमोर विजयासाठी १७३ धावांचे आव्हान ठेवले.
धावफलक
ऑस्ट्रेलिया – / ओव्हर – १७२/२
डेविड वॉर्नर – ५३
आरोन फिंच – ५
मिशेल मार्श -८५
मॅक्सवेल – २४
न्यूझीलंड – १७२/४ ओव्हर – २०
मार्टिन गुप्टील – २८
डेरिल मिशेल – ११
केन विल्यमसन – ८५
ग्लेन फिलिप्स – १८
जेम्स नीशम – १३
टीम सफर्ट – ८
—
जोश हॅझलवूड- ३
एडम जाम्पा – १