मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कॅरेबियन दौऱ्यावर होणाऱ्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी १८ सदस्यीय संघाची निवड केली आहे. या दौऱ्यात रोहित शर्मा हा टी-२० मालिकेत संघाचा कर्णधार असेल, तर विराट कोहली संघाचा भाग नसणार आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे आर अश्विनने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. या दिग्गज ऑफस्पिनरला पहिल्या T20 विश्वचषकात संधी मिळाली, पण त्यानंतर तो एकच मालिका खेळू शकला आणि नंतर तो बाद झाला. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे केएल राहुल आणि कुलदीप यादव यांचेही पुनरागमन झाले आहे, मात्र हे खेळाडू फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरच संघात पुनरागमन करू शकतील.
या दौऱ्यासाठी विराट कोहलीला संघात स्थान मिळालेले नाही. त्याला एकदिवसीय संघातून विश्रांती देण्यात आली होती, तर बीसीसीआयने टी-20 मालिकेबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. तो टी-20 संघाबाहेर आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र, त्याची दुखापत पाहता त्याला विश्रांती देण्यात आली आहे, असे म्हणता येईल. त्याच्याशिवाय जसप्रीत बुमराहलाही विश्रांती देण्यात आली आहे. बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंटचा भाग म्हणून विश्रांती देण्यात आली आहे, कारण टीम इंडियाला ऑगस्टच्या शेवटी आशिया कप खेळायचा आहे.
विराट आणि बुमराह व्यतिरिक्त यजुवेंद्र चहललाही विश्रांती देण्यात आली आहे, जो या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेचा भाग असणार नाही. उमरान मलिकची सलग तीन मालिकांसाठी निवड करण्यात आली होती. ज्यामध्ये त्याला दोन संधी मिळाल्या होत्या. परंतु चौथ्या मालिकेत त्याला वगळण्यात आले होते. याशिवाय रुतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांनाही वगळण्यात आले आहे. सॅमसनने अजूनही चांगली खेळी केली, पण गायकवाड फॉर्मशी झुंजताना दिसला.
असा आहे संघ
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर आवेश खान, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग.
(केएल राहुल आणि कुलदीप यादव यांचा समावेश फिटनेसवर अवलंबून आहे.)
T20 Series Indian Cricket Team Selection BCCI Announcement