विशेष प्रतिनिधी, मुंबई
केंद्र सरकारने साधारणतः छोट्या तीन ते चार बँकांचे एकत्रीकरण करून एक बँक करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच काही बँकांचे खासगीकरण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या धोरणानुसार सिंडीकेट बँकेचे कॅनरा बँकेत विलगीकरण करण्यात आल्याने आता मूळ ग्राहकांना आर्थिक व्यवहार करताना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेत विलीन झाली असून तिचा बँकिंग तपशील बदलणार आहे. यासंबंधी कॅनरा बँकेने म्हटले आहे की, तत्कालीन सिंडिकेट बँकेच्या शाखांचा आयएफएससी कोड १ जुलै पासून बदलला आहे. ग्राहकांना एनईएफटी / आरटीजीएस / आयएमपीएसद्वारे निधी मिळविण्यासाठी नवीन आयएफएससी कोड वापरावा लागेल.
नवीन कॅनरा बँकेचा आयआयएफएससी, एचटीएमएल किंवा कॅनरा बँकेच्या वेबसाइटवर किंवा कोणत्याही कॅनरा बँकेच्या शाखेत जाऊन मिळू शकते. पूर्वीच्या सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना बदललेल्या आयएफएससी आणि एमआयसीआर कोडसह नवीन चेक बुक मिळवावे लागेल. त्याचप्रमाणे नवीन शाखा कोड तपासण्याकरिता Canarabank.com/IFSC.html वर भेट द्या. तसेच जवळच्या शाखेत जाऊन आयएफएससी कोड देखील मिळवू शकता.
यापूर्वी १ जूनपासून बँक ऑफ बडोदाने ग्राहकांसाठी पाॅझेटिव्ह पेमेंट सेवा सुरू केली आहे. चेकची फसवणूक कमी करण्यासाठी ही सेवा आहे. एखाद्या ग्राहकाने २ लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कमेचा धनादेश जारी केला, तर ग्राहकाने त्यासंबंधीचा तपशील बँकेत जमा करावा. त्यानंतर बँक त्याची तपासणी करेल. धनादेशाची फसवणूक होऊ नये यासाठी बँकेची योजना आहे.