मंगळवार, ऑक्टोबर 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

क्षयरोग आणि कुष्ठरोगाची ही आहेत लक्षणे

सप्टेंबर 22, 2022 | 5:15 am
in राज्य
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जगात अनेक वर्षांपासून कुष्ठरोगाची समस्या आढळून येते. पूर्वीच्या काळी कुष्ठरोगावर इलाज नसल्याने व रुग्णास येणारी विद्रुपता व व्यंगामुळे या रुग्णांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा होता. मात्र आता बहुविधऔषधोपचार पद्धतीमुळे कुष्ठरोग कमी होत आहे. गेल्या काही काळापासून कुष्ठरुग्णांची संख्याही कमी होत आहे. कुष्ठरोग हा मुळापासून दूर करण्यासाठी देशात प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर क्षयरुग्णांची संख्याही कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे दि.13 ते 16 सप्टेंबर 2022 आणि 26 सप्टेंबर ते 7 ऑक्टोंबर या दोन टप्प्यात “कुष्ठरुग्ण शोध अभियान” व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत “सक्रिय क्षयरोग शोध मोहीम” संयुक्त मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेविषयी व यासंदर्भातील मार्गदर्शक सुचनाविषयीची माहिती.

राज्यातील 100 टक्के ग्रामीण भाग व शहरी भागातील जोखीमग्रस्त लोकसंख्या असणाऱ्या भागामध्ये कुष्ठरुग्ण शोध मोहिम व सक्रिय क्षयरोग शोध मोहिम 2022-23 राबविण्यात येत आहे. मोहिमेचा कालावधी :- दि. 13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022
उद्देश व पद्धती :
कुष्ठरोग
समाजातीलनिदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणणे.
नविनसांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे.
समाजातकुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे. कुष्ठरोगदुरीकरणाचे ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे.

क्षयरोग
क्षयरोगाचेनिदान न झालेल्या समाजातील क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना क्षयरोग औषधोपचारावर आणणे.
मोहीमेमध्येप्रशिक्षित पथकाद्वारे गृहभेट देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना शोधणे.
संशयीत क्षयरुग्णांचे थुंकी नमुने व एक्स रे तपासणी तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासणी करून क्षयरोगाचे निदान करणे आणि औषधोपचार सुरु करणे.
समाजातक्षयरोगाविषयी जनजागृती करणे.

अशी आहे मोहीम :
समन्वयासाठीअभियानांतर्गत विविध समित्यांची स्थापना, बैठका, मोहिमेचे नियोजन व अंमलबजावणी.
राज्यस्तरावरसंबंधित सर्व जिल्हा/ शहरांमधील जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा तसेच राज्यस्तरावर विभागीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली.
विविधस्तरावरसुक्ष्मकृती आराखड्यानुसार अभियानाचे नियोजन केले आहे.
प्रशिक्षण- आशा व पुरुष स्वयंसेवक व विविध स्तरावरील पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण.
कार्यक्षेत्रातअभियानाची प्रसिद्धी व आरोग्य शिक्षण कार्यक्रम.
प्रत्यक्ष सर्वेक्षण :- दि.13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022
मोहिमेचेसर्वस्तरावरून प्रभावी संनियंत्रण व पर्यवेक्षण.
विविधस्तरावरविहित कालावधीत अहवाल सादरीकरण.
घरोघर सर्वेक्षण :- दि.13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022

या मोहीमेमध्ये ग्रामीण व शहरी भागातील निवडक टीयुमधील अति जोखीमग्रस्त भागातील घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. घरामधील सर्व सभासदांची कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत शारिरीक तपासणी करण्यात येणार आहे. खालील लक्षणे असलेल्या व्यक्तींची कुष्ठरोगाचे संशयीत म्हणून नोंद घेण्यात येणार आहे.
■ त्वचेवर फिकट/लालसर बधीर चट्टा, त्याठिकाणी घाम न येणे,
■ जाड, बधीर तेलकट / चकाकणारी त्वचा.
■ त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे.
■ भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे.
■ तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा अथवा जखमा असणे.
■ हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात मनगटापासून किंवा पाय घोट्यापासून लुळा पडणे.
■ त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे.
■ हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातुन वस्तु गळून पडणे, चालतांना पायातुन चप्पल गळून पडणे.

क्षयरोगाची लक्षणे
दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला
दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा ताप
वजनात लक्षणीय घट
थुंकीवाटे रक्त येणे
मानेवरील गाठ
(वरीलपैकी कोणतेही एक लक्षण आढळून आल्यास त्यास संशयित क्षयरुग्ण म्हणून नोंद घेण्यात येणार आहे.)

एकूण14 दिवसांच्या सर्वेक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे.
दररोज एका टिम मार्फत त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागातील 20 ते 25 घरांचे व जोखीमग्रस्त भागातील 30 घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
घरातीलसर्व सभासदांची तपासणी करण्यात येईल. (महिला सभासदांची तपासणी आशा मार्फत व पुरुष सभासदांची तपासणी टिम मधील पुरुष कर्मचारी/स्वयंसेवकामार्फत करण्यात येणार आहे.)
जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार टीमची संख्या निश्चित करून त्यानुसार कृती आराखडा सादर करण्यात आला आहे.
मोहिमेच्या कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यास आपली आरोग्य समस्या सांगून त्यांना सहकार्य करा. कुष्ठरोग व क्षयरोग निर्मूलनासाठी सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

लक्षात ठेवा :
त्वचेवर असणारा चट्टा तपासून घ्या.
कुष्ठरोगाचे लवकर निदान करा.
बहुविध औषधोपचार (एम.डी.टी.)उपचार नियमित घ्या.
एम.डी.टी उपचाराने कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो.
कुष्ठरुग्णांशी भेदभाव करू नये.
क्षयरोगाविषयी अधिक माहितीसाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक १८००११६६६६ वर संपर्क साधावा. कुष्ठरोगासंबंधीच्या अधिक माहितीसाठी 022-24114000 या क्रमांकावर संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट द्या.

Symptoms of Tuberculosis and Leprosy
Health Survey
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब काढणार हुकमी एक्का

Next Post

अपघातात मृताचे साेने झाले होते गहाळ; पोलीसांचा बनाव असा झाला उघड, न्यायालयाने दिले हे निर्देश

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
मुख्य बातमी

बंपर दिवाळी भेट… एकाचवेळी ४७ महसूल अधिकाऱ्यांना बढती… बघा संपूर्ण यादी…

ऑक्टोबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा लक्ष्मीपूजनाचा दिवस… जाणून घ्या, मंगळवार, २१ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 20, 2025
rape
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरात महिला विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ… या तीन ठिकाणी गुन्हे दाखल…

ऑक्टोबर 20, 2025
Untitled 79
महत्त्वाच्या बातम्या

आज आहे लक्ष्मीपूजन! असे आहे मुहूर्त… अशी करा पूजा…

ऑक्टोबर 20, 2025
Diwali22
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – जगभर अशी साजरी होते दिवाळी! देशोदेशी अशा आहेत विविध प्रथा

ऑक्टोबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा नरक चतुर्दशीचा दिवस… जाणून घ्या, सोमवार, २० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 19, 2025
indian army e1750762947859
महत्त्वाच्या बातम्या

सुवर्णसंधी! भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? येथे मिळेल मोफत प्रशिक्षण…

ऑक्टोबर 19, 2025
messi
महत्त्वाच्या बातम्या

स्वप्न सत्यात येणार… फुटबॉल सम्राट मेस्सीसोबत खेळण्याची सुवर्णसंधी… युवा फुटबॉलपटूंनो फक्त हे करा…

ऑक्टोबर 19, 2025
Next Post
court

अपघातात मृताचे साेने झाले होते गहाळ; पोलीसांचा बनाव असा झाला उघड, न्यायालयाने दिले हे निर्देश

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011