नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्विस बँकेतील पैसा म्हणजे काळा पैसा, अशी असा एक साधारणपणे समज असतो, काही श्रीमंत भारतीयांकडे कोट्यावधीची संपत्ती असून ते आपला पैसा स्विस बँकेत ठेवतात असेही म्हटले जाते. भारतीय नागरिक आणि कंपन्या अनेक माध्यमातून स्विस बँकेत पैसे जमा करतात. त्यामध्ये ग्राहक ठेव, बँक, ट्रस्ट, सुरक्षा ही माध्यमे प्रमुख आहेत. मात्र 2021 मध्ये स्विस बँकांमधील भारतीयांच्या ठेवींमध्ये 8.3 टक्क्यांनी घट झाली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
काळा पैसा कर कायद्यांतर्गत परदेशात अघोषित संपत्ती जमा करण्याच्या 368 प्रकरणांमध्ये 14,820 कोटी रुपयांचे कर दायित्व उघड झाले आहे. लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. यासोबतच त्या म्हणाल्या की, 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये परदेशात दडवलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशात वाढ झाल्याच्या कथित मीडिया रिपोर्ट्स प्रत्यक्षात दिशाभूल करणारे आहेत.
निर्मला सीतारणम पुढे म्हणाल्या की, प्रसारमाध्यमांसह अनेक नागरिकांमध्ये सामान्य समज असा आहे की, स्वित्झर्लंड आणि परदेशात जमा असलेली सर्व भारतीयांची संपत्ती काळा पैसा (अघोषित) आहे. मात्र, बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्सच्या स्थानिक बँकिंग आकडेवारीच्या आधारे प्रसारमाध्यमे काळा पैसा वाढल्याचा दावा करत आहेत, या आकडेवारीवरून स्विस बँकांमध्ये भारतीय नागरिकांच्या ठेवींमध्ये घट झाल्याचे स्पष्ट होते.
भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये सन 2018 मध्ये एक करार झाला होता. या करारानुसार स्विस बँकेत असलेल्या भारतीय खात्यांबाबत स्विस बँकेकडून भारतीय आयकर विभागाला माहिती देण्यात येते. 2019 साली अशाप्रकारे प्रथम माहिती देण्यात आली होती. ज्या खात्यांवर संशय आहे, असा खात्यांची माहिती स्विस बँकेकडून भारत सरकारला देण्यात येते. स्विस बँकेत ब्रिटनचा सर्वाधिक पैसा आहे. ब्रिटन प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर अमेरिका, तिसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडीज, चौथ्या जर्मनी पाचव्या फ्रान्स आहे तर या यादीमध्ये भारत विसाव्या क्रमांकावर आहे.
Swiss Bank Money Deposit Increased or Decreased
Finance Minister Niramala Sitaraman Loksabha Parliament Question Answer