नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या उन्हाळा असल्याने अंगाची काहीली होते, त्यामुळे गारवा मिळवण्यासाठी ग्रामीण भागात अनेक जण नदी – नाले, धरण किंवा तलावात पोहण्यासाठीची तर शहरामधील जलतरण तलावात डुंबतात, पावले आरोप स्विमिंग पूलकडे वळतात. परंतु नागपुरातील एका उन्हाळी स्विमिंग शिबिरात डॉक्टराचा स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना बुडून मृत्य झाला. तर पुण्यात जलतरण तलावात पोहताना युवक बुडून मरण पावला. त्यामुळे पोहायला जाताना काळजी घेण्याची गरज आहे.
जीवरक्षक व प्रशिक्षक कुठे होते?
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर शहरात दि. ३१ मे रोजी एक डॉक्टराचा पोहताना बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घटना घडली. राकेश दुधे नावाचे शहरातील प्रसिद्ध डॉक्टर हे काल सायंकाळी स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेले होते. मात्र त्यांना पोहोता येत नव्हते त्याचवेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडायला लागले. तेव्हा ही बाब त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी डॉ. राकेश दुधे यांना स्विमिंग पूलच्या बाहेर उचलून काढले. परंतु नाका तोंडात पाणी गेल्याने ते बेशुद पडले होते.
त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वास्तविक उन्हाळी स्विमिंग शिबीर सुरु असताना तेथे जीवरक्षक आणि प्रशिक्षक असणे आवश्यक ठरते. परंतु डॉ. राकेश दुधे बुडत असताना तेथील जीवरक्षक आणि प्रशिक्षक कोठे गेले होते ? असा प्रश्न उपस्थित विचारला जात आहे. तसेच हा स्विमिंग पूल मागील तीन वर्षांपासून बंद होता. यावर्षी नगरपरिषदने स्विमिंग पूल नव्याने सुरु केला. मात्र या पूलच्या देखरेखीची जबाबदारी एका खासगी कंपनीकडे दिली आहे.
हडपसरला युवकाचा बुडून मृत्यू
पुण्यातील हडपसर भागात साधना स्कूलच्या जलतरण तलावात पोहताना एका १६ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. माळवाडी काळूबाई वसाहत येथील रहिवासी असलेला कृष्णा गणेश शिंदे हा साधना शाळेतील नववीत शिकणारा विद्यार्थी पोहायला गेला होता. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ जलतरण तलाव आहे. सकाळी तो स्विमिंग पूलमध्ये शिरला तर त्याचे काकाही त्याच्यासोबत होते. मात्र त्याच वेळी कृष्णाच्या काकांच्या लक्षात आले की तो तलावात बुडाला आहे. उपस्थित इतरांनी कृष्णाला तातडीने बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र नाकात आणि पोटात पाणी गेल्याने त्यांनी कृष्णाला मृत घोषित केले. मदर्स डेच्या दिवशीच स्वत:च्या लेकाचा मृत्यू पाहण्याची वेळ पुण्यातील एका आईवर आली, याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
Swimming Tank Drown Doctor Youth Nagpur Pune