इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – धावपळीच्या युगात कुणालाही जेवण बनवण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही, अशावेळी बाहेरून जेवण ऑर्डर केले जाते. यासाठी स्विगी आणि झोमॅटोसारख्या कंपन्या अग्रेसर आहेत, मात्र आता स्विगीने काही दर वाढविले आहेत. स्विगीने ग्राहकांकडून ऑर्डरवर प्लॅटफॉर्म फी म्हणून २ रुपये अतिरिक्त आकारण्यास सुरुवात केली आहे. स्विगी दिवसाला देशभरातून २० लाखपेक्षा जास्त ऑर्डर पुरवत करत असते.
सध्या ही वाढलेली किंमत केवळ हैदराबाद आणि बंगळुरूच्या ग्राहकांसाठी लागू आहे. या दोन शहरांमध्ये राहणाऱ्या ग्राहकांना जेवणाची ऑर्डर केली तर प्लॅटफॉर्म फी म्हणून २ रुपये जादा द्यावे लागतील. या पैशातून डिलिव्हरी सेवा अधिक चांगली होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. परंतु या वाढलेल्या किमती मुंबई आणि दिल्लीतील लोकांना अॅपवर दिसत नाहीत. कंपनी त्यांची सर्वत्र अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे.
मोठ्या शहरात जेवण मागवण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. यासाठी घरी बसून आपल्या आवडीची डिश स्विगी व झोमॅटो सारख्या फूड डिलिव्हरी प्लॅटफाॅर्मवरून मागवण्याची सुविधा उपलब्ध आहेत. मात्र काही ठिकाणी दर वाढविले असून या चार्जेसच्या बदल्यात कंपनी ग्राहकांना चांगली सेवा प्रधान करण्यावर भर देणार आहे. यामुळे पूर्वीपेक्षा चांगली सेवा उपलब्ध करून दिली जाईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.
रमजान महिन्यात हैद्राबाद शहरातील ग्राहकांनी सुमारे १० लाख बिर्याणी आणि ४ लाख प्लेट हलीम ऑर्डर केले होते. गेल्या महिन्यात स्विगीने गेल्यावर्षी ३ कोटी ३०लाख इडलीच्या डिश पोहोचवण्याचे काम केले आहे. यावर्षीच्या सुरूवातीला कंपनीच्या कंपनीच्या आर्थिक उत्पन्नात झालेली घट झाल्यामुळे सुमारे ४०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. आता हे नवीन एक्स्टा चार्ज लागू केल्यामुळे कंपनी आर्थिक स्थिती सुधारणार असल्याचे म्हटले जात आहे, परंतु ग्राहकांच्या खिशाला मात्र भुर्दंड बसणार आहे.
Swiggy Food Order Costly Charges Increased