इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मेडिसिन/फिजिओलॉजीचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. २०२२ चा हा पुरस्कार स्वीडिश शास्त्रज्ञ स्वंते पाबो यांना देण्यात आला आहे. स्वंते हे स्वीडनमधील अनुवंश शास्त्रज्ञ आहेत. ते उत्क्रांती अनुवांशिक तज्ज्ञ आहेत. विलुप्त होमिनिन आणि मानवी उत्क्रांतीच्या जीनोमशी संबंधित शोधांसाठी पाबो यांना हे नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे.
मेडिसिन/फिजिओलॉजीचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. २०२२ साठी स्वीडिश शास्त्रज्ञ नोबेल समितीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी सोमवारी स्वीडनमधील स्टॉकहोम येथील कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटमध्ये विजेत्याची घोषणा केली. नोबेल पुरस्कारांची घोषणा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाने सुरू झाली आहे. नोबेल पारितोषिक हा विज्ञान जगतातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. स्वीडनच्या कॅरोलिंस्का संस्थेच्या नोबेल असेंब्लीद्वारे हा पुरस्कार दिला जातो. त्याची बक्षीस रक्कम १० दशलक्ष स्वीडिश क्रून आहे.
नोबेल समितीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी सोमवारी स्वीडनमधील स्टॉकहोम येथील कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटमध्ये विजेत्याची घोषणा केली. नोबेल पुरस्कारांची घोषणा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाने सुरू झाली आहे. मंगळवारी भौतिकशास्त्र, बुधवारी रसायनशास्त्र आणि गुरुवारी साहित्य क्षेत्रातील हे पुरस्कार जाहीर केले जातील. या वर्षीचा (२०२२) नोबेल शांतता पुरस्कार शुक्रवारी जाहीर होणार असून अर्थशास्त्र क्षेत्रातील पुरस्कार १० ऑक्टोबरला जाहीर केला जाणार आहे.
https://twitter.com/NobelPrize/status/1576867617536503808?s=20&t=QYn-IF-fKL60xJMoraShDQ
Swedish Scientist Medical Nobel Award