नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविषयी स्वराज्य संघटनेच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करून निवेदन देण्यात आले. ‘राज्यपाल हटवा, स्वाभिमान वाचवा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ स्वराज्य संघटनेचा विजय असो अशा घोषणा देवून जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले. या वेळी पोलिसांनी विरोध केल्यामुळे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी स्वराज्य संघटनेच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी न केल्यास येणाऱ्या काळात राज्यपालांचे कार्यक्रम उधळून लावू असा इशारा स्वराज्यचे राज्य निमंत्रक गणेश कदम यांनी दिला. तसेच या पुढे कोशारीनीं छत्रपतींची विटंबना केल्यास राजभवनाला कुलुप लावण्याचा इशारा जिल्हा निमंत्रक रुपेश नाठे ज्ञानेश्वर थोरात यांनी दिला. यावेळी स्वराज्य चे निमंत्रक निखिल बोराडे ज्ञानेश्वर जाधव रोहिदास जाधव राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची हकालपट्टी करण्यासाठी ‘स्वराज्य’ संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर चव्हान, संतोष थोरात , गणेश नाठे, अजय कश्यप, सुमित कडवे, पियुष भोसले, निखिल बोराडे, ज्ञानेश्वर जाघव,सूजय सिंग, अभय कश्यप, संजीत सिंग, प्रतीक धोंगडे, नयन खैरनार, स्वप्निल आहेर, प्रणव देशमुख, प्रमोद पाटील,हर्षल जैन, सचीन नाठे ,गोरक सुरुडे , ऊमेश सुरुडे , समाधान जाधव , दिपक जाधव , उमेश मोरे , रतन नवले ,पोपट जाधव , तुषार डांगे ,निखील शिंदे राहुल नाठे , जिवन नाठे , राहुल मुसळ् , सचीन नाठे , करन शिंदे , रितेश शिंगोटे , बंटी सोनवने ,वैभव तांबो , पियुष विष्वकर्मा व स्वराज्य संघटनेचे नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यासह व अनेक स्वराज्यचे कार्यकर्ते उपस्थित होते.