इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन क्षेत्रात अभिनयापेक्षा वादग्रस्त विधानांनी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर. सोशल मीडिया असो की आणखी काही माध्यम जिथे कुठे स्वरा भाष्य करते ते वादग्रस्तच ठरत. यामुळेच स्वरा हिला मागे धमकीचं पत्र देखील आलं होत. आता पुन्हा एकदा स्वरा चर्चेत आली आहे. यावेळी तिने थेट बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानवर निशाणा साधत त्यावर आरोप केला आहे.
स्वरा भास्करने बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खानवर एक गंभीर आरोप केला आहे. स्वराने शाहरुख खानवर केलेल्या आरोपाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. स्वरा म्हणाली की, शाहरुख खानने माझी लव्ह लाईफ खराब केली आहे. स्वराचा हा आरोप ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वरा भास्कर म्हणाली की, आदित्य चोप्रा आणि शाहरुख खानमुळे माझे लव्ह लाईफ खराब झाले. मी तरूण असताना ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट पाहिला होता. हा चित्रपट पहिल्यापासून मी राजच्या शोधात आहे. मात्र, मला खूप दिवसांनी कळले की, राजसारखे कोणतेच व्यक्तिमत्व नाही. मी कितीतरी दिवस माझ्या आयुष्यात राजला शोधत होते. यामुळे मी लव्ह लाईफमध्ये खूप आनंदी नव्हते. सिंगल लाईफ जगणे खूप कठीण असून जोडीदार शोधणे देखील अवघड आहे, असे स्वरा भास्करने मुलाखतीमध्ये सांगितले. स्वराचा हा आरोप ऐकून हसावे की रडावे हा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही एवढं नक्की.
Actress Swara Bhaskar Serious Allegation on Actor Shahrukh Khan
Bollywood Entertainment Love Life