पुणे – एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या स्वप्नील लोणकर या २४ वर्षाच्या तरुणाने पुण्यात आत्महत्या केल्यानंतर सर्व स्तरातून सरकारच्या धोरणाबाबत संताप व्यक्त केला जात आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे माझ्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप स्वप्नीलच्या कुटुंबियांनी केला आहे. आमच्यावर जे संकट आले ते इतर कुणावर यायला नको अशी कळकळीची विनंती कुटुंबियांनी केली आहे. दरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नावर चर्चा करु असे सांगितले आहे.
स्वप्नीलने २०१९ आणि २०२० मध्ये झालेली एमपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला होता. पण, त्यानंतर तोंडी परीक्षा दीड वर्ष न झाल्यामुळे नैराश्यातून त्याने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने लिहिलेल्या सुसाईड नोटमधे आर्थिक परिस्थितीला कंटाळून आणि एमपीएससीची परीक्षा प्रक्रिया रखडल्याने आत्महत्या करत असल्याच म्हटले आहे. स्वप्नील हा मुळचा पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील असून तो कुटुंबांसह पुण्यात राहत होता. स्वप्नीलचे वडील पुण्यातील शनिवार पेठेत बिल बुक छापण्याचा व्यवसाय करतात.
स्वप्नीलने फुरसुंगी भागातील गंगानगर भागातील राहत्या घरी आत्महत्या केली. त्याची सुसाईड नोट आता समोर आली आहे…