रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ऑलिंपिकवीर स्वप्नील कुसाळे यांची या ठिकाणी भव्य मिरवणूक…अशी सुरु आहे तयारी

by India Darpan
ऑगस्ट 20, 2024 | 12:00 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20240819 WA0102 1140x570 1

कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पॅरिस येथील ऑलिंपिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेते नेमबाज स्वप्नील कुसाळे यांची जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवार २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता कावळा नाका येथील महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यापासून स्वागत मिरवणूक व त्यानंतर दसरा चौकात सत्कार समारंभ घेण्यात येणार आहे, या समारंभात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

नेमबाज स्वप्नील कुसाळे यांच्या मिरवणूक व सत्कार समारंभाबाबत नियोजन बैठक पालकमंत्री श्री.मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात घेण्यात आली. यावेळी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तालुकास्तरीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

पॅरिस येथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोजीशनमध्ये कांस्य पदक प्राप्त झाल्यानंतर स्वप्नील कुसाळे पहिल्यांदाच आपल्या जिल्ह्यात येत आहे. कावळा नाका येथील महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यापासून ते दसरा चौकापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून या मिरवणुकीनंतर दसरा चौकात सन्मानपत्र देऊन भव्य सत्कार गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या मिरवणुकीदरम्यान स्वप्नीलवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तर ढोल ताशा, हलगी व झांज पथकाच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणाऱ्या कोल्हापूरच्या सुपुत्राच्या कौतुक सोहळ्यात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने होणाऱ्या या भव्य मिरवणूक व सत्कार समारंभात नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या विभागाच्या मुलाखती पुढे ढकलल्या…

Next Post

महायुतीममध्ये महाभारत सुरु….तीन वादात एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप

India Darpan

Next Post
mayayuti

महायुतीममध्ये महाभारत सुरु….तीन वादात एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप

ताज्या बातम्या

modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या दोन तत्कालीन व्यवस्थापकांसह चार आरोपींना तीन वर्षांची सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

जून 22, 2025
nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

जून 22, 2025
Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011