बुधवार, नोव्हेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

श्री स्वामी समर्थ कृषी महोत्सवातून १२ कोटींची उलाढाल, १५० जणांना रोजगार

फेब्रुवारी 1, 2023 | 3:34 pm
in इतर
0
IMG 20230201 WA0026 e1675245771561

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्यावतीने आयोजित पाच दिवसीय जागतिक कृषी महोत्सवाचा समारोप झाला. कार्यक्रमाची सुरुवात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या तर समारोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्तीतीत संपन्न झाला. सर्वांसाठी मोफत प्रवेश असलेल्या या मोहत्सवास सहा राज्यांसह नेपाळ देशातून आलेल्या शेतकऱ्यांनी भारतीय पारंपरिक पद्धतीची विषमुक्त शेतीची माहिती जाणून घेतली. सुमारे चार लाख नागरिकांनी भेट दिली, तर महोत्सवात सुमारे १२ कोटींची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आयोजकांनी वर्तविला आहे.

श्री स्वामी समर्थ सेवामार्ग, स्वामी समर्थ गुरुपीठ आणि श्रीस्वामी समर्थ कृषी विकास आणि संशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने डोंगरे वसतिगृह मैदानावर पाच दिवसीय कृषी महोत्सव पार पडला. या महोत्सवात शेतीसंबंधित मोठी आर्थिक उलाढाल झाली. विषमुक्त शेती, भरड धान्य आणि सेंद्रिय शेतीच्या प्रसारावर भर देण्यात आलेल्या या महोत्सवात सुमारे चार लाख नागरिकांनी भेट दिल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला. नेपाळ येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महोत्सवाला हजेरी लावत सेंद्रिय शेतीचा प्रयोग आपल्या देशात करण्याचा संकल्प करीत चिनी तंत्रज्ञानावर नव्हे, तर भारतीय पारंपरिक पद्धतीची शेती आणि सेंद्रिय तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत आपली भूमिका असल्याचे सांगत माहिती जाणून घेतली. महोत्सवात स्थानिक शेतकऱ्यांची संख्या अधिक होती.

krushi advt

७ हजार बेरोजगार; १५० जणांना रोजगार
कृषी महोत्सवात ‘शेतीजोड व्यवसाय’ आणि स्वयंरोजगार सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रासाठी सुमारे सात हजार कृषी पदवीधरांसह बेरोजगार तरुणांनी हजेरी लावली होती. या तरुणांना अनेक अॅग्रिकल्चर कंपन्यांचे शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ दाखल झाले होते. महोत्सवात मेळाव्यात शेतीसंलग्नित कंपन्यांकडून कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आला. त्यातून दीडशे तरुणांना थेट नियुक्तीपत्रे देण्यात आली.

आठ सामुदायिक विवाह संपन्न
विवाह संस्कार विभागाच्या वतीने सुमारे पाच हजार विवाह मुला मुलींची नोंदणी झाली तर त्याच ठिकाणी आठ विवाह संपन्न झाले. या वेळी नवदाम्पत्यांना संसार उपयोगी वस्तू आबासाहेब मोरे यांच्या हस्ते देण्यात आल्या.

महोत्सवास येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विनामुल्य प्रवेश घेण्यासाठी ग्रीन पास चा यशस्वी वापर झाल्याने सर्वांनी या संकल्पनेचे स्वागत केले.
गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने कृषी महोत्सवाची कीर्ती जागतिक पातळीवर पोहोचली आहे. नेपाळसह देशातील सहा राज्यांतील शेतकऱ्यांनी भेट दिली. पाच दिवसांच्या या महोत्सवात शेतकऱ्यांची मोठी उलाढाल झाली. लाखो नागरिकांनी भेट दिली. स्थानिक शेतकऱ्यांचीदेखील लाखोंनी उलाढाल झाली. तरुण बेरोजगारांना रोजगार आधार मिळाला.
-आबासाहेब मोरे, कृषी अभियान प्रमुख, सेवा मार्ग

Swami Samartha Agri Expo Success 12 Crore Turnover

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पैशांसाठी दोघा मुलांनी आईचाच केला खून; आत्महत्या केल्याचा केला होता बनाव

Next Post

राज्यपाल कोश्यारींच्या अडचणीत वाढ! आता उच्च न्यायालयाने पाठवली नोटीस, हे आहे प्रकरण

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 11, 2025
crime1 1
इतर

नाशिक शहरात वाहनचोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच… एकाच दिवसात एवढे गुन्हे दाखल….

नोव्हेंबर 11, 2025
IITF 2025
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत होणार भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 11, 2025
WhatsApp Image 2025 11 11 at 4.23.33 PM
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य… या विजेत्यांची झाली घोषणा…

नोव्हेंबर 11, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर… बघा, कोणते प्रभाग झाले राखीव…

नोव्हेंबर 11, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

नगरपालिका निवडणुकीचा धुराळा सुरू असताना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे मोठे निर्णय…

नोव्हेंबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा मंगळवारचा दिवस… जाणून घ्या ११ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 10, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

दारू पाजून तरुणीवर बलात्कार… अश्लील फोटो व्हायरल करण्याचीही धमकी… मित्रासमवेत शरीरसंबंधांची बळजबरी…

नोव्हेंबर 10, 2025
Next Post
Bhagat Singh Koshyari

राज्यपाल कोश्यारींच्या अडचणीत वाढ! आता उच्च न्यायालयाने पाठवली नोटीस, हे आहे प्रकरण

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011