नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे सुरू असलेल्या जागतिक कृषिमहोत्सवात शुक्रवार (ता. २७) तिसऱ्या दिवशी झालेल्या विवाह इच्छुकांच्या मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद लाभला.5000 विवाहोच्छुक मुलामुलींनी आपली नावनोंदणी केली तर या वेळी झालेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात आठ जोडपी विवाह बंधनात अडकली. आज कळवण येथिल एग्रो केअर अँड क्रॉप सायन्स इंडस्ट्रीज चे संचालक भूषण निकम यांना ‘कृषी माउली’ पुरस्कारही प्रदान करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी विनामूल्य विवाह नोंदणी व वधू-वर परिचय मेळावा झाला. सेवामार्गाच्या विवाह संस्कार विभागांतर्गत झालेल्या या मेळाव्यात पाच विवाहेच्छुकांनी नोंदणी केली गेली व या वधू-वर परिचय मेळाव्यात जुळलेल्या विवाहांपैकी आठ जोडप्यांचा विवाह देखील अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत झाला.कन्यादान योजनेद्वारे नवदांपत्यांना संसारोपयोगी साहित्य प्रदान केले. महोत्सवामध्ये कृषीमार्ट लक्षवेधी ठरत आहे. मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ‘कन्यादान पुण्य महान’ हा उपक्रम घेतला.
यावेळी स्वयंरोजगार मेळाव्याच्या निमित्ताने बोलतांना सत्यजित तांबे म्हणाले कि, सध्या विवाह आणि रोजगार ही मोठी समस्या निर्माण झाली आहे मात्र स्वामिसमर्थ सेवा मार्गातून या दोन्ही गोष्टी एकत्रित रित्या सोडविण्यासाठी काम सुरू आहे हे सर्वात पवित्र असे काम आहे. तरुणांनी नोकरी न शोधता नोकरी देण्याची सामर्थ्य आपल्यात आणावे, आज शेतकऱ्यांच्या मुलाला मुलगी देतांना विचार केला जातो हे चुकीचे आहे, मुलगा बघतांना त्याची कमाई न बघता त्याची क्षमता, आचार, विचार, संस्कृती याचा विचार करावा.
यावेळी रोजगार मेळाव्यात बोलतांना ज्ञानेश्वर बोडके म्हणाले की, जैविक शेतीला आज खूप महत्व आले आहे भाजीपाला लागवडी पासूनच खरेदी साठी लोक आजही तयार आहे मात्र तो पिकविणाऱ्या साठी प्रयत्न दिसत नाही, सात्विक भाजीपाल्या बरोबरच A2 दुधाला खूप मागणी आहे त्याच्या व्यवसाय वाढी साठी प्रयत्न करावा
Swami Samartha Agri Expo Samudayik Vivah Sohala