इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्राचीन काळात अनेक साधू, ऋषींनी जिवंत समाधी घेतल्याचे वर्णन पुराणांमध्ये आढळते. इतकेच नव्हे तर ते पुन्हा प्रकट झाल्याचे ही सांगण्यात येते. परंतु आधुनिक काळात एखाद्या साधूने जिवंत समाधी घेतल्यानंतर तो पुन्हा प्रकट झाला, तर कोणी विश्वास ठेवणार नाही. मात्र मध्य प्रदेशात असा चमत्कार घडल्याची चर्चा सुरू आहे.
भोपाळ शहरानजिक एका साधूने जिवंत समाधी घेतल्यावर तो तीन दिवसांनी म्हणजे ७२ तासांनी पुन्हा समाधीतून बाहेर आला, असे सांगण्यात येते. आता या साधूला पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. आपण तीन दिवसात स्वर्गलोकात जाऊन आलो असून तेथे अत्यंत प्रसन्न वातावरण आहे. तसेच आपल्या शरीरात ११ अनंत शक्तींचा संचार झाल्याचेही या साधू बाबाचे म्हणणे आहे. दरम्यान, विज्ञानवादी दृष्टिकोन असलेल्या संस्था संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांनी हे थोतांड असल्याचे आणि साधूचा बनाव असल्याचे म्हटले आहे.
भोपाळच्या दक्षिण टीटी नगरमध्ये अशोक सोनी उर्फ पुरुषोत्तमानंद महाराज हे मंदिराच्या परिसरात असणाऱ्या माता भद्रकाली विजयासन दरबार या आध्यात्मिक संस्थेचे संस्थापक आहेत. पुरुषोत्तमानंद महाराज यांना नवरात्र उत्सवात देवीच्या आदेशाने समाधी घेण्याचा साक्षात्कार झाला. त्यानुसार त्यांनी शुक्रवार, दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता समाधी घेण्यासाठी गेले होते, सुमारे ७ फूट खोल खड्ड्यात बाबांची समाधी होती. समाधी असलेला खड्डा लाकडी स्लॅब आणि वरून मातीने झाकलेला होता. ही समाधी पूर्ण झाल्यानंतर त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले व त्यांनी बाबांचे आशीर्वाद घेतले. अद्यापही दर्शनासाठी येथे नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.
पुरुषोत्तमानंद यांचा मुलगा मित्रेश कुमार यांनी सांगितले होते की, त्यांच्या वडिलांनी समाधीसाठी १० दिवस आधी अन्न सोडले होते आणि ते फक्त रस घेत होते. बाबा ७२ तास म्हणजे दिवस मैदानात राहून सोमवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी अष्टमीच्या दिवशी सकाळी ११ वाजता त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली. त्यानंतर त्यांच्या समाधीवर लावलेली लाकडी फळी काढून नियोजित वेळेनुसार बाहेर काढण्यात आली. यावेळी त्यांचे भक्त आणि स्थानिक लोक मोठ्या संख्येने जमा झाले. देवी मातेच्या आदेशानुसार ते तीन दिवसीय भू-समाधीतून बाहेर पडले. यानंतर समाधीस्थळी त्यांना दूधाचाअभिषेक करण्यात आला व आरती करण्यात आली.
समाधीतून बाहेर आल्यानंतर बाबा पुरुषोत्तमंद यांनी सांगितले की, तरुणांना ड्रग्ज घेताना पाहून मी समाजहितासाठी मी पून्हा समाधी घेणार असून या व्यसनावर मात करण्याचा संकल्प केला. पुढच्या वेळी ८४ तास समाधी घेणार आहे. तीन दिवस समाधीत राहूनही त्यांना कोणत्याही प्रकारची कमजोरी जाणवत नाही. या तीन दिवसांत त्यांनी माता दुर्गा यांची भेट घेतली. तीन दिवस फक्त त्यांचे शरीर पृथ्वीवर होते, तर आत्मा पूर्णपणे भगवंताशी एकरूप होता. या काळात बाबा स्वर्गाही जाऊन आल्याचे सांगतात. मात्र पोलीस व प्रशासनाने या समाधी प्रकरणाला परवानगी दिली नव्हती, त्यामुळे आता बाबांवर कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
RT @NBTMP: स्वामी पुरुषोत्तमानंद महाराज तीन दिन बाद भू समाधि से बाहर आ गए हैं। यह देखने के लिए उनके आश्रम में भक्तों की भारी भीड़ थी। @NavbharatTimes #MPNews #BhopalBhooSamadhi pic.twitter.com/uN4t3akwGG
— Bharat Kumar Tiwari ? (@bharatbkt) October 3, 2022
Swami Purushottamanand Samadhi Return after 3 Days
Bhopal Madhya pradesh