मुंबई – सुझुकी या जापानच्या कारनिर्माता कंपनीतर्फे Ertiga FF Sports मॉडलचे अनावरण करण्यात आले आहे. नव्या व्हर्जनमध्ये या एमपीव्हीला नवा स्पोर्टी लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कारच्या एक्सटिरिअरमध्ये नव्या ग्रिलपासून अलॉय व्हिलपर्यंत बदलत गेले आहे. इंटिरिअरमध्ये अनेक जबरदस्त फिचर्स पाहण्यास मिळतात. नवा व्हेरिएंट इंडोनेशियामध्ये सादर करण्यात आला आहे. भारतात याच्या अनावरणाबद्दल घोषणा करण्यात आलेली नाही.
नव्या अर्टिगाचे फिचर्स
वाहनाच्या एक्सटिरिअरसंदर्भात बोलायचे झाल्यास Ertiga FF Sports च्या समोर नवे हनिकॉम्ब मेश ग्रिल, स्पोर्टी बंपर, L-शेप्ड DRL आणि ड्युअल टोन अलॉय व्हिल पाहण्यास मिळणार आहे. इंटिरिअरमध्ये वूड इंसर्टसह एक ऑल ब्लॅक डॅशबोर्ड आणि रेड स्टिचिंगसह ब्लॅक अपहोल्स्ट्री देण्यात आली आहे. त्यामध्ये ८ इंचाचा टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, स्टार्टअप बटनासह किलेस एन्ट्री, स्टिअरिंग माउंटेड ऑडियो कंट्रोल आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलसारखे फिचर्स देण्यात आले आहे.
सुरक्षेसाठी
अर्टिगामध्ये सुरक्षेसाठी एमपीव्हीमध्ये ड्युअल एअरबॅग, रिअऱ पार्किंग सेंसर, हिल होल्ड असिस्ट, फायर एक्सटिंगुइशर आणि एबीएस सोबत ईबीडी सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. कारच्या फक्त एक्सटिरिअरमध्ये बदल झाला आहे, इंजिन पूर्वीसारखेच आहे. त्यामध्ये १.५ लिटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ते १०५ पीएसची कमाल पॉवर जनरेट करते. इंजिनला ५ स्पीड एमटी आणि ४ स्पीड टॉर्क कन्व्हर्टर एटीसोबत जोडण्यात आले आहे. या एफएफ स्पोर्ट ट्रिमला भारतीय बाजारात आणण्याचे मारुती सुझुकीचे अद्याप कोणतेही नियोजन नाही. भारतात मारुती XL6 ची विक्री करते. या कारला अर्टिगाच्या तुलनेत जास्त प्रीमियम व्हर्जन मानले जाते.