मुंबई – सुझुकी मोटरसायकल कंपनीने भारतात आपली नवीन स्कूटर Suzuki Avenis लाँच केली असून याचे सर्वांनाच आकर्षण वाटत आहे. परंतु विशेषत: तरूणांमध्ये या नवीन स्पोर्टी स्कूटरची मोठी क्रेझ दिसून येत आहे. या अनेक नवीन सुविधा असलेल्या या 125cc च्या स्कूटरची किंमत सुमारे 87 हजार रुपये आहे. भारतीय बाजारपेठेत सुझुकी एवेनिसची स्पर्धा आता TVS Ntorq 125, Honda Grazia, Hero Maestro Edge 125 आणि Aprillia SR 125 या चार बाईक तथा स्कूटरशी होईल, असे दिसत आहे.
अनेक नवीन वैशिष्ट्यांसह सुसज्ज
या 125cc सुझुकी एवेनिस स्कूटरमध्ये कॉलर आयडी, एसएमएस अलर्ट, व्हॉट्सअॅप अलर्ट, वेगवान अपघाताची सूचना, फोन, बॅटरी लेव्हल डिस्प्ले यासारख्या उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह येते. ही स्कूटर iOS आणि Android प्लॅटफॉर्मशी जोडलेली आहे. स्कूटरचे 125cc फ्युएल-इंजेक्टेड इंजिन 8.6 bhp पॉवर आणि 10Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.
विविध प्रकार अन् किंमत
Suzuki Avenis स्कूटरच्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 86,700 रुपये आहे. त्याच वेळी, सुझुकीच्या या स्कूटरच्या रेस एडिशनची एक्स-शोरूम किंमत 87,000 रुपये आहे. तसेच सुझुकी एवेनिस स्कूटरमध्ये बॉडी माउंटेड एलईडी, मोठी स्टोरेज स्पेस, यूएसबी चार्जिंग पोर्ट, एलईडी टेल लॅम्प, स्पोर्टी कव्हर, अलॉय व्हील्स, आकर्षक ग्राफिक्स, साइड स्टँड लॉक, इंजिन किल स्विच, ड्युअल लगेज हुक आणि फ्रंट रॅक स्टोरेज ही तिची वैशिष्ट्ये आहेत.
विक्री केव्हा
सुझुकी मोटरसायकल इंडिया डिसेंबरच्या मध्यापासून Suzuki Avenis स्कूटरची किरकोळ विक्री सुरू करेल. सदर स्कूटर ही मेटॅलिक ट्रायटन ब्लू कलरसह 5 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. सुझुकी एवेनिसचा रेस एडिशन प्रकार सुझुकी रेसिंग ग्राफिक्ससह देण्यात आला आहे. या स्कूटरची इंधन टाकी क्षमता 5.2 लीटर आहे. स्कूटरच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि मागच्या बाजूला स्विंग आर्म सस्पेन्शन आहे.