बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंना राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणारे केंद्र…प्रस्ताव अंतिम टप्यात

by Gautam Sancheti
जून 18, 2025 | 4:53 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250618 WA0212 1

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य शासनाच्या युवा व क्रीडा विभागाच्या माध्यमातून जळगाव शहरात विभागीय क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, लवकरच मेहरूण शिवारात बांधकाम सुरू होणार आहे या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींना आणि खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिध्द करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत.

जिल्ह्याच्याच ठिकाणी दर्जेदार प्रशिक्षण:
या क्रीडा संकुलात ट्रॅक अ‍ॅन्ड फिल्ड, फुटबॉल,कुस्ती, कबड्डी, खो-खो, सॉफ्टबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, योगासने, जलतरण, शूटिंग, क्रिकेट ,टेनिस,मार्शल आर्ट आणि जिम्नॅस्टिकसारख्या विविध क्रीडा प्रकारांसाठी स्वतंत्र सुविधा असणार असून, प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षित मार्गदर्शक, निवासी वसतिगृह, आहार, क्रीडा वैद्यक शास्त्र व वैद्यकीय सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

क्रीडा मान्यतेकडे वाटचाल:
विभागीय क्रीडा संकुलाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्याला स्वतंत्र क्रीडा केंद्र म्हणून मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. हे संकुल केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता राज्यस्तर आणि राष्ट्रीयस्तराच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास पात्र असेल.

खेलो इंडिया, मिशन लक्षवेध, युवा विकास अभियानाशी संलग्न:
या प्रकल्पाची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या ‘खेलो इंडिया’ आणि राज्य शासनाच्या ‘मिशन युवा’ अभियानाशी संलग्न असून, खेळाडूंना स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून देण्यासाठी भक्कम पायाभूत क्रीडा सुविधा पुरविण्याचा उद्देश आहे.
या प्रकल्पासाठी केंद्रिय क्रीडा व युवककल्याण मंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, महापालिका प्रशासन, यांचे नियोजन सुरू असून, मेहरूण परिसरात हे भव्य क्रीडा संकुल आकार घेईल.

“खेळाडूंना संधी… जळगाव जिल्ह्याला क्रीडा मान्यता!”
या घोषवाक्याला अनुसरून शासन खेळ क्षेत्रात भरीव गुंतवणूक करत असून, या संकुलाच्या स्थापनेमुळे ग्रामीण आणि आदिवासी बहुल भागातील खेळाडूंना पुढे येण्यासाठी आवश्यक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षण….या लिंकवर नागरिकांना नोंदवता येणार मत

Next Post

या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरचे फेसलिफ्ट मॉडेल केले लाँच…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
oplus_1048578

या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरचे फेसलिफ्ट मॉडेल केले लाँच…

ताज्या बातम्या

Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून २० हून अधिक महिलांचा लैंगिक मानसिक छळ

जुलै 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी प्रयत्नांमध्ये काटकसर करू नये, जाणून घ्या, बुधवार, ९ जुलैचे राशिभविष्य

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011