नाशिक – अखिल भारतीय सुवर्णकार समाज संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील विभाग प्रमुखांची निवड करण्यात आली आहे. नुकतेच अखील भारतीय सुवर्णकार समाज संस्थेच्या कार्यकारी मंडळाची बैठक सिडको येथे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भास्कर मैंद यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी प्रकाश वडनेरे यांची राज्य कार्यकारणीत खजिनदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर सुनील महालकर यांची नाशिक विभाग प्रमुख, नंदकुमार दुसाने यांची निफाड विभाग प्रमुख, सुमंत आहिरराव याची सिडको विभाग प्रमुख, प्रकाश थोरात याची पंचवटी विभाग प्रमुख, राजेंद्र दुसाने यांची नाशिकरोड विभाग प्रमुख व बाळासाहेब सोनगीरकर यांची सातपूर विभाग प्रमुख पदी सर्वानुमते निवड करून भास्कर मैंद यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. प्रारंभी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष कै. रामचंद्र येरपुडे व कै. रमेश लोळगे या दिवंगत पदाधिकाऱ्यांना कार्यकारणीच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन नाशिक जिल्हा अध्यक्ष रमेश वडनेरे यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश बागुल, सचिव प्रकाश भामरे, संघटक सचिव राजेंद्र येवलेकर, प्रदेश उपाध्यक्ष अरविंद बागुल, वाघ, विसपुते आदी सभासद उपस्थित होते.