नवी दिल्ली – आजच्या काळात अत्याधुनिक, सर्व सोयीसुविधांनी उपयुक्त आणि आपल्या आर्थिक बजेटमधील कार खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यात अनेक कंपनीच्या कारचे विविध प्रकारचे मॉडेल दिसून येतात. भारतातील मोठ्या आणि महागड्या कारऐवजी लोक आता कमी परवडणार्या एसयूव्ही खरेदी करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे या एसयूव्ही कारची विक्री सुसाट सुरू आहे.
भारतात लहान एसयूव्हीची चांगली श्रेणी असून ग्राहक त्यांच्या आवडीचा पर्याय निवडू शकतात. आपल्याला सुद्धा अशीच एसयूव्ही कार खरेदी करायची असेल तर भारतातल्या काही सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीची माहिती जाणून घेऊ…
मारुती सुझुकी विटारा ब्रेझा
मारुती सुझुकी विटारा ब्रेझामध्ये 1.5-लीटर बीएस 6 पेट्रोल इंजिन असून ते 6000 आरपीएम वर 103.25 एचपी उर्जा आणि 4400 आरपीएम वर 138 एनएम टॉर्क तयार करते. इंजिनाचे 5 स्पीड मॅन्युअल आणि स्वयंचलित गेअर बॉक्स आहे. ब्रेझ्झा ही कार मॅन्युअलमध्ये 17.03 किमी प्रति लीटर आणि ऑटोमॅटिकमध्ये 18.76 किमी पीएलचा मायलेज देऊ शकतो.

ह्युंदाई व्हेन्यू
ह्युंदाई व्हेन्यूमध्ये 3 इंजिन पर्याय उपलब्ध आहेत, त्यातील एक 1.5 लीटर 4-सिलेंडर, टर्बो डिझेल, बीएस 6 इंजिन आहे. त्यात 90 बीएचपी आणि 220 न्यूटन मीटर उर्जा निर्मिती करतो. यात 1.0 लिटर बीएस 6 टर्बो पेट्रोल इंजिन असून ते सहा स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनसह सुसज्ज आहे.
टाटा नेक्सन
टाटा नेक्सन एसयूव्हीमध्ये 1.2 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर टर्बो डिझेल इंजिन दिले गेले आहे. तसेच याचे 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन 120 पीएस कमाल शक्ती आणि 170 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. 1.5 लिटर टर्बो डिझेल इंजिन 110 पीएसची जास्तीत जास्त शक्ती आणि 260 एनएमची पीक टॉर्क जनरेट करते. या कारच्या टर्बो डिझेल मॉडेलमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि गिअरबॉक्ससह 6-स्पीड स्वयंचलित ट्रांसमिशनचा पर्याय आहे.
