पुणे – आजच्या काळात प्रत्येकाला आपल्या आवडीची कार खरेदी करण्याचा मोह होतो. विशेषतः अनेकांना सेडान कार खूप आवडते. मात्र तरीही सेडान ही लक्झरी कारसारखी दिसत नाही. त्यामुळे काही जणांना ती खरेदी करावी वाटत नाही, कारण विचारसरणीत आणि आवडी-निवडींमध्ये काळानुरूप बरेच बदल होतात. सध्या भारतीय बाजारपेठेत एसयूव्ही कार घेणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. एसयूव्ही वाहनांनी सेडान गाड्यांना विक्रीमध्ये मागे टाकण्याचे कारण काय आहे हे 4 महत्त्वाच्या गोष्टीतून जाणून घेऊ या..
भारतीय बाजारपेठेत अनेक प्रकारच्या SUV कार आहेत, याचा अर्थ ग्राहकांना त्यांची निवड करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामुळे, डिझाइनच्या बाबतीत खरेदीदारांना अधिक पर्याय प्रदान केले जातात. त्याच वेळी, सध्याच्या सबकॉम्पॅक्ट आणि कॉम्पॅक्ट एसयूव्हींनी त्यांची मागणी वाढवली आहे.
एसयूव्हीमध्ये बसल्यानंतर, कार चालकाला रस्ता अगदी स्पष्ट दिसतो, कारण कार थोडीशी उंच असल्याने, ड्रायव्हिंग सीट देखील इतर कारच्या तुलनेत किंचित उंचावलेली असते. अनेकदा असे दिसते की, सेडानच्या तुलनेत एसयूव्हीमध्ये बसलेली व्यक्ती ट्रॅफिक आणि आजूबाजूच्या वाहनांमध्ये जास्त सक्रिय असते. त्यामुळे रस्ता सुरक्षा असो किंवा वैयक्तिक संरक्षण असो या दोन्ही बाबतीत एसयूव्ही अधिक आकर्षक असतात.
बहुतेक SUV चे ग्राउंड क्लिअरन्स जास्त असते, तसेच खडबडीत रस्त्यांवर त्या व्यवस्थित चालतात. त्यामुळे वाहनात बसलेल्या प्रवाशांना त्रास होत नाही, त्याचप्रमाणे ग्राउंड क्लीयरन्स जास्त असल्याने वाहन खराब होत नाही. तसेच रस्त्यावर वाहन चालवणे सोपे होते. यामुळे गाडीच्या अंडरबॉडीला कोणतीही हानी होत नाही.
सेडानपेक्षा एसयूव्ही अधिक आरामदायक आहे, कारण ती अधिक स्पेस देते, त्यामुळे प्रवासी लांबच्या प्रवासातही आरामात बसू शकतात. त्यामुळेच सध्या भारतीय बाजारपेठेत एसयूव्ही कार घेणाऱ्या ग्राहकांची संख्या जास्त दिसत आहे. एसयूव्ही वाहनांनी सेडान कार पेक्षा ग्राहकांची पसंती मिळवली आहे.