सोमवार, नोव्हेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ऑटोनॉमस लेव्हल २ तंत्रज्ञानासह भारतातील ही आहे पहिली एसयूव्ही कार

सप्टेंबर 15, 2021 | 7:32 pm
in संमिश्र वार्ता
0
Rajeev Chaba President and MD MG Motor India

 

मुंबई – एमजी मोटर इंडियाने वैयक्तिक एआय असिस्टंट आणि फर्स्ट-इन-सेगमेंट ऑटोनॉमस (लेव्हल २) तंत्रज्ञानासह भारतातील पहिली एसयूव्ही एमजी ॲस्टर बाजारपेठेत दाखल केली. जागतिक स्तरावर यशस्वी ठरलेल्या झेडएसवर ॲस्टर एमजी आधारित आहे. एमजी ॲस्टर १९ सप्टेंबरपासून एमजी शोरूममध्ये दिसेल आणि त्यानंतर लवकरच बुकिंगला सुरुवात होईल. सॉफ्ट-टच आणि प्रीमियम मटेरियलसह इंटिरिअर सुबक कलाकुसरीने तयार केले गेले आहे. हे दोन इंजिन पर्यायांमध्ये येणार आहेत – ब्रिट डायनॅमिक २२० टर्बो पेट्रोल इंजिन ज्यात ६-स्पीड एटी आहे जे तब्बल २२० एनएम टॉर्क आणि १४० पीएस पॉवर देते आणि दुसरे – मॅन्युअल ट्रान्समिशनसह व्हीटीआय टेक पेट्रोल इंजिन आणि ८-स्पीड सीव्हीटी, १४४ एनएम टॉर्क आणि ११० पीएस पॉवर देते.

एमजी ॲस्टरच्या वैयक्तिक एआय असिस्टंटमध्ये मानवासारख्या भावना आणि आवाजाची वैशिष्ट्ये जोडली आहेत. पॅरालिम्पिक ॲथलिट दीपा मलिकने वैयक्तिक एआय सहाय्यकाला आपला आवाज दिला आहे, ज्याद्वारे हा अनुभव वैयक्तिक पातळीवर सुलभ होईल. ॲस्टरमधील एआय तंत्रज्ञान एमजीच्या संभाव्यतेच्या कार-एज-ए-प्लॅटफॉर्म (सीएएपी) च्या दृष्टीकोनाभोवती विकसित केले गेले आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेनुसार सेवा अंगीकृत करणे शक्य होईल.
एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि एमडी राजीव चाबा म्हणाले, “आम्ही आमच्या एसयूव्हीसह भारतीय ऑटोमोटिव्ह मार्केटमध्ये अनेकदा उद्योगात प्रथम सादरीकरण केले आहेत. यावेळी आमच्याकडे वैयक्तिक एआय सहाय्यकासह ऑटोनॉमस लेव्हल २, एमजी ॲस्टर आहे. त्याचे सुंदर बाह्य भाग, आलिशान इंटिरिअर आणि भविष्यातील तंत्रज्ञानामुळे, आम्हाला विश्वास आहे की ॲस्टर हे एक परिपूर्ण पॅकेज आहे जे ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.”

एमजीने एस्टरमधील एडीएएस (प्रगत ड्रायव्हर-असिस्टन्स सिस्टम) साठी बॉशबरोबर भागीदारी केली आहे. एआय तंत्रज्ञान, सहा रडार आणि पाच कॅमेरे एसयूव्हीला १४ प्रगत ऑटोनॉमस लेव्हल २ वैशिष्ट्ये व्यवस्थापित करण्यासाठी सुसज्ज करतात. ही कार ईएसपी, टीसीएस आणि एचडीसी सारख्या २७ मानक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुरक्षित ड्रायव्हिंग अनुभव सुनिश्चित करते. त्याच्या आराम, सुविधा आणि सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये ६ एअरबॅग्स, ६-वे पॉवर-ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, गरम ओआरव्हीएम, रेन-सेन्सिंग वायपर, पीएम २.५ फिल्टर, पॅनोरॅमिक स्काय रूफ, रिअर एसी व्हेंट आणि फ्रंट आणि रिअर आर्मरेस्ट, १०.१ इंच एचडी इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ७ इंच एम्बेडेड एलसीडी स्क्रीनसह पूर्ण डिजिटल क्लस्टर यांचा समावेश आहे.

एस्टरमध्ये एमजी आय-स्मार्ट तंत्रज्ञानावरील ८०+ इंटरनेट वैशिष्ट्ये आहेत. त्याच्या वर, सीएएपी (कार एज ए प्लॅटफॉर्म) आहे, एमजी ॲस्टर सबस्क्रिप्शन आणि सेवा आयोजित करते, ज्यात मॅपमायइंडियासह नकाशे आणि नेव्हिगेशन, जिओ कनेक्टिव्हिटी, कोयनेर्थ द्वारे अशा प्रकारचे पहिले ब्लॉकचेन-संरक्षित वाहन डिजिटल पासपोर्ट आणि बरेच काही समाविष्ट आहे. एमजी कार मालकांना जिओसाव्हन ॲपवर संगीताची मैफल रंगविता येईल, तसेच हेड युनिटद्वारे पार्किंग स्लॉट सर्व्ह करण्याचे या प्रकारातील-पहिले वैशिष्ट्य अनुभवता येईल (पार्क+द्वारे संचालित, सुरुवातीस निवडक शहरे) आणि विकिपीडियासह माहितीच्या खजिन्यात अमर्याद भटकता येईल.

एमजीच्या भावनिक चलनशक्तीच्या तत्त्वज्ञानाशी निगडित ॲस्टरची समकालीन शैली ग्राहकांना आपलेसे करेल. यात एक प्रख्यात बोल्ड सेलेस्टियल ग्रिल आहे जो रस्त्यावर एक ठोस छाप पाडतो. एसयूव्ही ने क्लासिक लेपर्ड जंप शोल्डर लाईनसह एक मनमोहक आणि कृतीशील भूमिका बिंबवली आहे. एलईडी हेडलॅम्प्समधील ॲस्टरचे नऊ क्रिस्टल डायमंड घटक अचूक तपशीलांसह त्याला एक स्पष्ट प्रकाशझोत देतात. ब्रिटनमधील लंडन येथील एमजीच्या ग्लोबल डिझाइन सेंटरचे प्रगत डिझाइन संचालक कार्ल गॉथम यांनी ॲस्टरबद्दल सांगितले, “भावनिक चलनशक्ती ही संकल्पना ॲस्टरला प्रीमियम फील आणते. अपवादात्मक पातळीच्या तपशीलासह उल्लेखनीय वैशिष्ट्यांमुळे ही मिड-साइज एसयूव्ही डोळ्यांचे पारणे फेडते. कार तयार करताना आम्ही डिझाइन केंद्रस्थानी ठेवले. जेणेकरून ती त्याच्या तंत्रज्ञानाइतकी चपखल दिसेल. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि डिझाइन उत्कृष्टतेसह एमजीच्या ब्रँडचा वारसा पुढे नेते. वैयक्तिक एआय सहाय्यासह एमजी ॲस्टर भारतीयांना सुलभ ड्रायव्हिंगचा अनुभव देईल.”

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे निर्णय

Next Post

राज ठाकरे यांचा २१ ते २३ सप्टेंबर रोजी नाशिक दौरा; तयारीसाठी राजगडवर बैठक

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
4 1

राज ठाकरे यांचा २१ ते २३ सप्टेंबर रोजी नाशिक दौरा; तयारीसाठी राजगडवर बैठक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011