मुंबई – भारतीय बाजारपेठेत आता मायक्रो-एसयूव्ही सेग्मेंटमध्ये जोरदार स्पर्धा बघायला मिळणार आहे. कारण टाटा मोटर्सने आपल्या मायक्रो एसयूव्ही टाटा पंचची घोषणा केलेली आहे. तर तिकडे दक्षिण कोरियातील वाहन कंपनी ह्युंदाईने सुद्धा आपल्या Casper या मायक्रो एसयूव्हीचे टिझर रिलीज केले आहे.
ह्युंदाईच्या या कारमध्ये दोन पेट्रोल इंजीन असणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याचे कोडनेम AX1 असे आहे. ही कार केवळ आकारातच नाही, तर किमतीतही कमी असणार आहे. कंपनीने ही कार जागतिक स्तरावर लॉन्च करण्याची तयारी केली आहे. ह्युंदाई १५ सप्टेंबरला या कारचे प्रॉडक्शन सुरू करेल, असे सांगितले गेले आहे. कंपनीच्या K1 या प्लॅटफॉर्मवर या कारची निर्मिती होणार आहे. या पद्धतिने यापूर्वी सँट्रो आणि ग्रँड आय10 या दोन गाड्यांची निर्मिती कंपनीने केली होती. सुरुवातीला दक्षिण कोरियात ही कार ल़न्च होईल त्यानंतर भारत व इतर देशांमध्ये विक्रीसाठी सादर होईल. काही दिवसांपूर्वी या कारचे टिझर कंपनीने रिलीज केले, तेव्हा त्यात कारचे सर्कुलर हेडलँप आणि टेललँप बघायला मिळाले होते. त्यामुळे ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे.
असे असेल इंजीन
इंटरनेटवर लिक झालेल्या माहितीनुसार ह्युंदाईच्या Casper मध्ये 1.0 लिटर क्षमतेची दोन इंजीन असणार आहेत. यात एक नॅचरल एक्स्पायर्ड असेल आणि दुसरे टर्बो इंजीन असेल. पहिले इंजीन 76hp चे पॉवर आणि ४ स्पीड आटोमॅटिक गियबॉक्ससोबत येईल. तर टर्बो इंजीन 100hp पॉवर जनरेट करेल आणि ४ स्पीड ट्रान्समीशन गियरबॉक्ससोबत मार्केटमध्ये येईल. भारतीय बाजारपेठेत मात्र कुठल्या इंजीनचा वापर होईल, हे सांगण्यात आलेले नाही. मात्र ग्रँड आय10 च्या 1.2 लीटर नॅचरल एक्स्पायर्ड इंजीनचा वापर होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.