मुंबई (इंडिाय दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारने नोव्हेंबरमध्ये होणा-या पोलीस भरतीला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिल्यामुळे भरतीची तयारी करणा-या विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. राज्यभरात तब्बल १४ हजार ९५६ पदांसाठी भरती होणार होती. त्यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या होत्या. पण, ही स्थगिती आल्यामुळे ही भरती पुन्हा लांबणीवर पडली आहे. या भरतीच्या स्थगितीचे कारण समजले नसले तरी पुढील आठवड्यात याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या तीन वर्षांमध्ये पोलीस भरती झालेली नसल्यामुळे अनेक तरुण वयोमर्यादेमध्ये बसत नाही. त्यामुळे भरतीसाठी वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी आहे. त्यामुळे याबाबत विचार सुरु असल्याचे बोलले जात आहे. ही भरती १ नोव्हेंबरपासून सुरु होणार होती. पण, आता ती केव्हा होईल याकडे लक्ष लागले आहे.