शनिवार, मे 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचे कारागृहात असभ्य वर्तन, कर्मचाऱ्यांनाही दिली धमकी

by India Darpan
नोव्हेंबर 6, 2022 | 3:33 pm
in संमिश्र वार्ता
0
sachin waje

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बडतर्फ पोलिस अधिकारी आणि संशयित आरोपी सचिन वाझे हे कारागृहात कैद असताना आपण आजारी असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात यावे असे वारंवार सांगत आहेत, तसेच कर्मचाऱ्यांशी ते कोणत्याही प्रकारे सहकार्य करत नाहीत, या उलट त्यांच्याशी उद्धटपणे वागणूक करत असल्याने तुरुंग प्रशासन त्रस्त झाले आहे. आता तर त्यांनी कारागृहातील सुरक्षा रक्षकांसोबत असभ्य वर्तन करत धमकीही दिली, असा आरोप करीत तळोजा तुरुंग प्रशासनाने वाझेविरोधात मुंबईतील सत्र न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे वाझे यांना न्यायालयाच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. तुरुंग प्रशासनाच्या तक्रारीमुळे आपल्या अडचणींमध्ये मोठी वाढ होऊ शकते, यापुर्वी एका प्रकरणात वाझेने सत्र न्यायालयात माफी मागितली आहे.

केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने भ्रष्टाचार प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक अधिकारी सचिन वाझे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती. आपण देशमुख यांच्या आदेशानुसारच मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचे सचिन वाझेने तपासा दरम्यान सांगितले होते. त्यानंतर अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटकेनंतर निलंबित असलेले वाझे यांना लवकरच मुंबई पोलिस दलातून बडतर्फ केले होते. सध्या वाजे हे तळोजा कारागृहात आहेत. चौकशी करण्याची परवानगी विशेष पीएमएलए न्यायालयाने ईडीला दिली होती. मात्र त्यानंतरही वाझे यांची चौकशी झालेली नाही.

अँटीलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप आहेत. तर माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांच्यावर आरोप करण्यात आलेल्या शंभर कोटी वसुली प्रकरणामध्ये वाझे माफीचे साक्षीदार बनले होते. याच प्रकरणी वाझे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती तुरूंग प्रशासनाने न्यायालयाला दिली होती. पण आता वाजे यांच्या त्रासाने तुरुंग प्रशासन कंटाळले आहे
कारण वाझे हा सुरुवातीपासूनच जेलमधील त्याच्या वागण्यावरून चर्चेचा विषय राहिला आहे. त्याने नुकतेच सत्र न्यायालयात आपल्या डोळ्यांच्या त्रासाबद्दल म्हणणे मांडले आहे.

दोन्ही डोळ्यांमध्ये ग्लुकोमा झाला असल्याने मला रुग्णालयात दाखल होण्यासाठी परवानगी द्या, अशी विनंती त्याने सत्र न्यायालयाला केली आहे. त्याच्या या विनंतीची दखल घेत तुरुंग प्रशासनाला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. याच दरम्यान वाझेने रुग्णालयात नेण्यासाठी तुरुंगातील सुरक्षा रक्षकांबरोबर मोठा वाद घातल्याचे उघडकीस आले आहे. त्याने सुरक्षारक्षकांना असभ्य भाषेत धमकावल्याचेही तुरुंग प्रशासनाने तक्रारीत म्हटले आहे.
वाझे यांना सुरक्षा रक्षकाने अडवताच त्याने जोरजोरात ओरडत धमकी दिली. याबाबत तळोजा तुरुंग प्रशासनाने सत्र न्यायालयातील एनआयच्या विशेष कोर्टात तक्रार दाखल केली आहे. सत्र न्यायाधीशांनी तुरुंग प्रशासनाच्या तक्रारीची दखल घेत सचिन वाझेच्या वकिलांना उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी आता दि. १० नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

Suspended Police Officer Sachin Waze Bad Behavior in Jail

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सातपूरला अंबड लिंक रोडवर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक जखमी

Next Post

भारताचा झिम्बाब्वेवर शानदार विजय; सेमीफायनलमध्ये या संघाशी होणार भारताचा सामना

Next Post
Fgjrm0yWQAI8Lbz scaled e1667391869431

भारताचा झिम्बाब्वेवर शानदार विजय; सेमीफायनलमध्ये या संघाशी होणार भारताचा सामना

ताज्या बातम्या

Hon CM @ Metro 3 phase opening 2 1024x953 1 e1746811674674

मुंबई मेट्रो लाईन-३ सेवेचा विस्तार शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…

मे 9, 2025
IMG 20250509 WA0079 1024x683 1

पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले जाईल…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मे 9, 2025
Untitled 21

आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा, त्यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा आणि दूरदृष्टीचा अभिमान…लोकसभा अध्यक्ष

मे 9, 2025
crime 13

घरात पाय घसरून पडल्याने ८० वर्षीय वृध्दाचा मृत्यू

मे 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अर्थकारण सुधारणार, जाणून घ्या, शनिवार, १० मेचे राशिभविष्य

मे 9, 2025
IMG 20250509 WA0290 1

नाशिक येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या उपकेंद्र विकासाचा प्रस्ताव सादर करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011