मंगळवार, डिसेंबर 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

न्या. विकास बडे यांना उच्च न्यायालयाने केले निलंबित, या ठिकाणी होती बदली

मार्च 17, 2025 | 7:15 am
in संमिश्र वार्ता
0
suspended

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रायगड जिल्ह्यातील न्याय व्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या उरण न्यायालयाचे दुसरे सहन्यायाधीश विकास दत्तात्रेय बडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होताच गेल्याच आठवड्यात त्यांची बुलढाण्यातील मोताळा येथील न्यायालयात बदली करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांचा कारभार न्या. एस. एस. गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे आदेश मोताळा न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीशांनी बजावले आहेत.

न्या. विकास बडे यांच्याविरोधात उरण बार असोसिएशनने रायगड जिल्हा प्रमुख न्यायाधीश अजेय राजंदेकर यांच्याकडे भ्रष्टाचाराच्या तपशीलासह लेखी अर्ज दिल्याने त्याची दखल घेत, न्या. राजंदेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे माहिती पाठविली होती. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या बदलीचे तातडीने आदेश काढून उरणहुन बुलढाण्यातील मोताळा येथे दुसरे सहन्यायाधीशपदी तडकाफडकी बदली करण्यात आली.

आठवडाभरातच मुंबई उच्च न्यायालयाने आदेश काढून न्या. बडे यांना निलंबित केले आहे. मोताळा न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीशांनी बडे यांना निलंबित करून त्यांच्याकडील कारभार न्या. एस. एस. गायकवाड यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्याचे निर्देश दिले आहेत. न्या. बडे यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी केली जाणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मोताळा मुख्य न्यायालयात कार्यरत रहावे लागणार आहे. त्यांच्याकडे प्रशासकीय कामकाज असण्याची शक्यता आहे. चौकशीचा निकाल लागेपर्यंत सरकार त्यांना अर्धपगारावर राबवणार आहे.

पनवेल येथील सुरुंगाचा
पहिला दणका उरणला!

पनवेल न्यायालयात बोगस वारस दाखल्याचे कांड उघडकीस आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयसुद्धा भ्रष्टाचार, घोटाळ्याबाबत अधिक सजग झाले आहे. त्यात न्यायालयीन कर्मचारी, अधिकारी आणि काही न्यायाधीश संशयाच्या भोवऱ्यात असल्याने दोन्ही वरिष्ठ न्यायालयाने भ्रष्टाचारविरोधी तातडीने पावले उचलली आहेत. थोडक्यात पनवेल येथील सुरुंगाचा पहिला दणका उरणचे न्यायाधिश विकास बडे यांना बसला आहे.

न्यायाधीशांच्या सहभागाचीही चर्चा
पनवेलच्या काही वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे कांड चव्हाट्यावर आल्यानंतर न्यायाधीशांच्या सहभागावर चर्चेच्या संशयाची सुई फिरत होती. परंतु, अद्याप कुणावरही कारवाई झाली नाही. परंतु, तपासातून काही आक्षेपार्ह पुरावे हाती लागल्याने पनवेल न्यायालयातील न्यायाधीश’ जात्यात असल्याची चर्चा कानावर येत आहे. ते कोण आहेत, याबाबत गोपनियता बाळगण्यात आली आहे.

नऊ जणांना जेलवारी
पनवेल न्यायालयात हजारो स्फोटकांच्या एकत्रित ताकदीचा बोगस वारस दाखला, ई-चलन, स्टॅम्प पेपर घोटाळा उघडकीस आल्यानंतर न्यायालयाने दाखल केलेल्या फिर्यादीवरून पनवेल शहर पोलिस आणि विशेष तपास पथकाने नऊ जणांना जेलवारी घडवली आहे.त्यात न्यायालयातील सहअधीक्षक, वरिष्ठ कारकून आणि नक्कल कारकून यांचा मोठा सहभाग उघडकीस आला आहे. सगळ्यात लाजिरवाणी बाब म्हणजे पनवेल वकील बार असोसिएशनचा ऑडिटर आणि त्याच्या पाच वकील साथीदारांनी मोठा घोळ घातला आहे. ते सुध्दा या कटाला कारणीभूत ठरले आहेत.एक दलाल सुद्धा यात समाविष्ट असल्याने कुंभमेळ्यातून परताच त्याचीही मानगुटी पकडून पोलिसांनी जेलमध्ये डांबले आहे. आता पाळी आणखी काही महत्वाच्या प्याद्यांची येईल,
असे रंग स्पष्ट होत आहेत. पोलिसांनी त्यांच्या दिशेने जाळे फेकल्याचे समजते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं विषारी औषध…आमदार नितीन पवार यांच्याकडून त्रास होत असल्याची तक्रार

Next Post

नाशिक येथील कुसुमाग्रज स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली भेट….

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
IMG 20250316 WA0305 1

नाशिक येथील कुसुमाग्रज स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली भेट….

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011