नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री तसेच भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांची मुलगी बासुरी स्वराज ही राजकारणात प्रवेश केला आहे. आई सुषमा स्वराज यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याची मनीषा व्यक्त करत बासुरी भाजपकडून राजकीय आखाड्यात ग्रँड एंट्री केली आहे. तिच्यावर सध्या भाजपच्या कायदेशीर सेलचे सहसंयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
बासुरी स्वराज या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात. २००७मध्ये त्या दिल्ली बार कौन्सिलमध्ये रुजू झाल्या. इंग्रजी साहित्यात बीए ऑनर्ससह पदवी घेतल्यानंतर, त्यांनी लंडनमधील बीपीपी लॉ स्कूलमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सेंट कॅथरीन कॉलेजमधून मास्टर्स केले आहे. बासुरी स्वराज यांना भाजपच्या कायदेशीर सेलचे सहसंयोजक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना दिल्लीचे कार्याध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले, बासुरी स्वराज यांची नियुक्ती तात्काळ लागू होईल आणि भाजपला बळकट करेल अशी अपेक्षा आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून नियुक्ती पत्राचा फोटो शेअर करत बासुरी स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, भाजपचे सरचिटणीस बीएल संतोष, भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि भाजप दिल्ली यांचे आभार मानले आहेत.
आईचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी
सुषमा स्वराज यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. मोदी सरकारमध्ये देखील त्यांना मोठी जबाबदारी मिळाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना परराष्ट्र मंत्री केल्यानंतर त्यांनी या पदावर असताना सर्वसामान्यांना न्याय देण्याता पूरेपूर प्रयत्न केला. त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणूनही कारकीर्द गाजविली आहे. त्यांचा राजकीय वारसा त्यांच्याप्रमाणेच सक्षमपणे पुढे नेण्याची जबाबादारी बासुरी यांच्यावर असणार आहे.
https://twitter.com/BansuriSwaraj/status/1639967952643710976?s=20
Sushma Swaraj Daughter Bansuri Politics Entry