इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
तुमच्याकडे वेळ भरपूर आहे. फक्त भाजप वगळून इतर सगळ्यांची प्रकरणे हातात कशी काय येतात या प्रश्नाचं उत्तर नाहीय आणि हे आमच्या व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. असो, तुमचं पुढचं टार्गेट गडकरी असतील तर आम्हाला फार नवल वाटणार नाही. कारण गडकरी हे तसे मोदी आणि फडणवीस दोघांनाही नकोच आहेत..असे ट्विट सुषमा अंधारे यांनी केले.
तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सध्या मी एका खूप मोठ्या विषयावर काम करत आहे. त्यामुळे मी @RRPSpeaks आणि @andharesushama ह्यांना विनंती करते की एक आठवडा थांबा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देईन. पण सध्या माझ्याकडे वेळ खरच खूप कमी आहे.
तर दुस-या एका व्टिटमध्ये अंधारे यांनी दमानिया जी, उत्तर द्यायला फार वेळ लावता बाबा तुम्ही… तेही खरंच आहे म्हणा.. भाजपाला सल्ला देऊन उरलेल्या वेळात अनिशजी तुम्हाला सल्ला देणार. मग तुम्ही ट्विट करणार. या सगळ्यांमध्ये वेळ तर नक्कीच लागणार…असो. एकूण काय तर तुमच्या मागच्या दोन दिवसांपासून ज्या अत्यंत बॅकफूटला जाऊन भूमिका घेणे चालू आहे त्याने एक तर स्पष्ट झाले की तुम्ही भाजपच्या विरोधात बोलू शकत नाही.
तुम्ही अण्णा हजारेंच्या टीम मध्ये होतात.
तुम्ही कधीही नोटबंदी, महागाई, पीएम केअर घोटाळा, ईडीचा दुरुपयोग, इलेक्ट्रोल बाँड , प्रज्वल रेवन्ना, मुंबईतील निकृष्ट दर्जाचे मेट्रोचे काम यावर व्यक्त होणार नाहीत. मी तुमची अडचण अगदीच समजू शकते..! फक्त हे सरळ सरळ मान्य करण्याच्या ऐवजी मोठेमोठे सुविचार आणि कोट टाकून जो तुमचा महान बनण्याचा प्रयत्न आहे तो अत्यंत केविलवाणा आहे. चला तुम्हाला अजून प्रश्न विचारून त्रास देणार नाही.
यावर अंजली दमानिया यांनी महाराष्ट्राच्या दोन विद्वान नेत्यांना माझे आदरपूर्वक उत्तर. माझ्या कृतींबद्दलच्या त्यांच्या समजुतींबद्दल, किंवा माझ्या हेतूंबद्दलच्या त्यांच्या गृहीतकांबद्दल, त्यांच्याशी वाद घालून उपयोग नाही. जे योग्य आहे ते करण्याचे प्रयत्न करावे आणि पुढे जावे. आणि हो, या दोन्ही नेत्यांनी कुठचाच विषय, ना कधी लावून धरला, ना कधी तडीस नेला.