इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लहान मुलांवर लादण्याचा सरकारचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मराठी माणसाच्या एकजुटीने हाणून पाडला. २९ जून २०२५ ला सरकारने हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर ठाकरे बंधु विजयी मेळावा मुंबईत वरळी डोम सभागृहात साजरा झाला. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार भाषण केले. हे सर्व वातावरण बघून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मराठीच्या मुद्द्यावरून चॅलेंज करणारे शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार सुशील केडिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राज ठाकरे यांची माफी मागितली.
दरम्यान मेळाव्या अगोदर मनसेने सुशील केडियाचो कार्यालय फोडले. त्यामुळे केडिया जमीनीवर आला. ठाकरे बंधुच्या एकत्र येण्यानंतर हा पहिला दणका बसला असल्याचे बोलले जात आहे..
आजच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकांरांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. तबब्ल १८ वर्षांनी राज – उद्धव एकत्र आल्यामुळे शिवसेना भवनाबाहेर जोरदार बॅनरबाजी करण्यात आले आहे. सुरुवातीला मुंबई वरळी डोममध्ये ‘जय जवान गोविंदा पथक’ ७ थर लावून सलामी देण्यात आली. या सोहळ्यात
फक्त दोन खुर्च्या होत्या. मागे महाराष्ट्राचा नकाशा लावण्यात आला होता. ठाकरे बंधूंचा या विराट विजयमेळाव्यानंतर याची जोरदार चर्चा सुरु झाली.
या मेळाव्यानंतर लगेच केडियाने माफी मागीतली….