नाशिक – सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव शाखा नाशिकच्या वतीने मंडळाच्या अठराव्या वर्धापनदिनानिमित्त रविवार २८ नोव्हेंबर २०२१ रोजी नाशिक येथे एक दिवसीय राज्यस्तरीय अठरावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.या संमेलनात असे आहेत भरगच्च कार्यक्रम
पहिले सत्र
सकाळी ९ ते १२ उद्घाटन सोहळा
स्वागताध्यक्ष- सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा सोनार (नाशिक)
संमेलनाध्यक्ष- खानदेशातील सुप्रसिद्ध लेखिका सौ माया दिलीप धुप्पड (जळगाव )
उद्घाटक- ज्येष्ठ पत्रकार श्री चंदुलाल शहा (नाशिक)
समारोप- सुप्रसिद्ध लेखिका लिला शिंदे (औरंगाबाद)
प्रमुख पाहुणे- सुप्रसिद्ध कवी प्रा श्री फ मु शिंदे (८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष)
सुप्रसिद्ध लेखक प्रा श्री बी एन चौधरी – धरणगाव ( उद्घाटक सतरावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलन)
श्री मिलींद कुळकर्णी- कार्यकारी संपादक दै लोकमत नाशिक
दुसरे सत्र दुपारी १२ ते १.००
थोरांच्या स्मृती जागवणारा जागवू या स्मृती
अध्यक्ष- प्रा श्री लक्ष्मण महाडीक (पिंपळगाव)
सहभाग- प्रा श्री मिलींद चिंधडे- नाशिक (वामनराव कर्डक)
संगीता पवार – फुके , नाशिक (किशोर पाठक)
श्री रवींद्र मालुंजकर-नाशिक (विलास पगार)
१ ते २ विश्रांती
तिसरे सत्र- दुपारी २ ते २.४५
कथाकथन अध्यक्ष- प्रा विजया मारोतकर (नागपूर)
सहभाग- श्री विलास मोरे (एरंडोल)
प्रा सौ प्रतिभा जाधव -निकम (लासलगाव)
चौथे सत्र- दुपारी २.४५ ते ३.४५ परिसंवाद
विषय- साहित्य कालचे, आजचे आणि उद्याचे
अध्यक्ष- प्रा डाॅ श्री यशवंतराव पाटील (नाशिक)
सहभाग- श्री मोहनदास भामरे (शिरपूर)
श्री कमलाकर पाटील (नाशिक)
श्री सप्तर्षी माळी (नाशिक)
पाचवे सत्र- सायंकाळी ३.४५ ते ६.००
शब्दझंकार सत्राअंतर्गत कविसंमेलन
अध्यक्ष- कविश्री कमलाकरआबा देसले ( झोडगे ता मालेगाव)
सहावे सत्र- सायंकाळी ६ ते ७ समारोप
पुरस्कार प्रदान सोहळा
अध्यक्ष- लिला शिंदे- औरंगाबाद
विशेष प्रमुख उपस्थिती- सुप्रसिद्ध लेखक प्रा डाॅ श्री सदानंद मोरे – पुणे (८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष, १५ वे सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष)
गौरवार्थी सारस्वत
* स्व सौ बदामबाई हेमराज देसर्डा, स्व प्रा पन्नालाल भंडारी यांच्या स्मरणार्थ अठराव्या वर्षाचा सूर्योदय साहित्य गौरव पुरस्कार
श्री खलील मोमीन (मनमाड जि नाशिक)
*पहिला सूर्योदय बालकवी पुरस्कार
डाॅ श्री सुरेश सावंत (नांदेड)
* अठरावा सूर्योदय सेवारत्न पुरस्कार
प्रा विजया मारोतकर (नागपूर)
* पहिला सूर्योदय गोदा साहित्य गौरव पुरस्कार
श्री तुकाराम धांडे (इगतपुरी जि नाशिक)
* पहिला सूर्योदय गोदा सेवारत्न पुरस्कार
डाॅ श्री प्रकाश कोल्हे (नाशिक
* सूर्योदय कथाभूषण पुरस्कार विभागून
डाॅ श्री प्रभाकर शेळके (जालना) यांच्या व्यवस्थेचा बइल या कथासंग्रहाला.
श्री शरद पुराणिक (नाशिक) यांच्या मंगळदेवाची कहाणी या विज्ञानकथासंग्रहला .
अर्चना दहिवदकर (पुणे)यांच्या शेवटी मी स्त्री या कथासंग्रहाला.
सलमा (मुंबई) यांच्या माझे मन या कथासंग्रहाला प्रत्येकी रूपये
सूर्योदय काव्यभूषण पुरस्कार विभागून
शोभा बडवे (मालेगाव जि नाशिक) यांच्या अंतःस्वर या काव्यसंग्रहाला.
माळेवाडी जि सोलापूर येथील गणेश गोडसे(माळेवाडी जि सोलापूर)) यांच्या पाणी घातल्या झाडाची पानगळ या काव्यसंग्रहाला,
स्मिता जयस्वाल(इंदोर ) यांच्या माझे निशब्द काव्य या काव्यसंग्रहाला.
श्री संतोष मेटकर (मुंबई) यांच्या गाणी पाऊस अक्षराची या काव्यसंग्रहाला
* राज्यस्तरीय सानेगुरुजी काव्य पुरस्कार
श्री हबीब भंडारे (औरंगाबाद) यांच्या मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं या काव्यसंग्रहाला.
* स्व. दलिचंद बस्तिमल सांखला यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय सूर्योदय काव्य पुरस्कार प्रा डाॅ प्रतिभा जाधव (लासलगाव जि नाशिक) यांच्या संवाद श्र्वास माझा या काव्य संग्रहाला
* विशेष काव्य पुरस्कार बालकवी श्री संकल्प जीवनराव शिंदे (देगलूर जि नांदेड) याच्या अंकुर या काव्यसंग्रहाला. * स्व सौ.जिसकुँवर भगवानसिंग गिरासे यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय सूर्योदय साहित्य पुरस्कार श्री दिवाकर मोरस्कर (लवारी -उमरी जि भंडारा) यांच्या चुलबंद की नारी ॠतुजा या कादंबरीला
* स्व सौ.जशोदाबाई कालुसिंह परदेशी यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय सूर्योदय कथा पुरस्कार विभागून श्री संजय गोराडे ( नाशिक) यांच्या निर्णय या कथासंग्रहाला
श्री सुनील मंगेश जाधव (उमरोळी जि पालघर) यांच्या मन भुकेत रंगल
या कथासंग्रहाला
* स्व दामू वासनकर यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय सूर्योदय बालकाव्य पुरस्कार विभागून श्री विठ्ठल जाधव (शिरूरकासार जि बिड) यांच्या उंदरीन सुंदरीन या बालकाव्यसंग्रहाला
श्री दीपध्वज कोसोदे (मुक्ताईनगर जि जळगाव) यांच्या पिंपळाचं झाड या बालकाव्यसंग्रहांला
* स्व सर्जेराव पाटील यांच्या स्मरणार्थ सूर्योदय गझल पुरस्कार श्री अरविंद सगर (वसमत रोड जि परभणी)यांच्या गझल माणसांची या गझल संग्रहाला
राज्यस्तरीय गिरिजा कीर कथा पुरस्कार विभागून
तनुजा ढेरे(ठाणे) यांच्या फुलवा या कथासंग्रहाला.
श्री रमेश निंबाजी सरकाटे(भुसावळ) यांच्या उब या कथासंग्रहाला.
* गिरिजा कीर युवा सूर्योदय कथा पुरस्कार किरण सोनार (नाशिक) यांच्या हजार धागे सुखाचे या कथासंग्रहाला (सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ नाशिक कार्यकारिणी जाहीर होण्याआधी किरण सोनार यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता).
* सूर्योदय शब्दमाऊली कल्पना चौधरी (रायपूर छ.ग.) यांच्या सूर या काव्यसंग्रहाला
तरी आपली उपस्थिती द्यावी ही विनंती.
या संमेलनाला सर्वांनी उपस्थिती रहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष प्रतिभा सोनार, शहराध्यक्ष सावळीराम तिदमे, कार्याध्यक्ष देवचंद महाले पाटील, कार्याध्यक्ष अमोल चिने पाटील, उपाध्यक्ष सौ सुरेखा अशोक बो-हाडे,किरण सोनार, जनार्दन माळी, मृणाल गिते,आकाश तोटे सर्व सदस्य नाशिक शाखा व सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ सतीश जैन यांनी केले आहे.
संमेलनस्थळ
मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक संचलित
धनलक्ष्मी बाल विद्यामंदिर व प्राथमिक , माध्यमिक शाळा, मानवधन विद्यानगरी, (पाषाणपुष्प) पाथर्डी फाटा नाशिक ४२२०१० विलास पगार नगर, किशोर पाठक सभागृह ,