मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये आला आहे. त्याने त्याच्या भात्यातील एक-एक शॉट खेळयास सुरुवात केली आहे. त्याचे अफलातून शॉट पाहून भलेभले तोंडात बोट टाकत असताना क्रिकेटचा देव म्हणविल्या जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरदेखील चक्रावला आहे. सुर्याच्या त्या झकास शॉटबद्दल सचिनने ट्वीटदेखील केले आहे.
सूर्यकुमारने गुजरात टायटन्सविरुद्ध ४९ चेंडूत ११ चौकार आणि ६ षटकारांच्या जोरावर १०३ धावांची नाबाद शतकी खेळी केली. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा मेन्टॉर सचिन तेंडुलकरने ट्वीट करत सूर्यकुमार यादवचे कौतुक केले. सचिन ट्वीटमध्ये म्हणाला, सायंकाळी आकाशात सूर्या चमकला. सूर्यकुमारने संपूर्ण इनिंगमध्ये जबरदस्त शॉट्स मारले. पण मोहम्मद शमीला थर्डमॅनच्या दिशेने ठोकलेला षटकार माझ्यासाठी खास होता. त्या शॉटचा अॅंगल क्रिएट करण्यासाठी त्याने ज्या पद्धतीने बॅट फिरवली, ते इतके सोपे नाहीये. सचिनने या ट्वीटमध्ये सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमीलाही टॅग केले आहे. गुजरात टायटन्सचे १९ वे षटक सुरू असताना मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर सूर्यकुमारने हा षटकार ठोकला.
सूर्याची आक्रमक फलंदाजी पाहून समालोचक कक्षात रवी शास्त्री आणि केविन पीटरनस यांनीही आश्चर्य व्यक्त केला. दरम्यान, रोहित शर्मा आणि ईशान किशनने पॉवर प्ले मध्ये धडाकेबाज फलंदाजी करून मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. परंतु, राशिद खानच्या गोलंदाजीवर मुंबईचे दोन्ही सलामीवीर बाद झाले आणि मुंबईला मोठा धक्का बसला. त्यानंतर मैदानात उतरलेला नेहर वढेराही राशिदच्या गोलंदाजीचा शिकार झाला.
परंतु, कमालीचा फॉर्ममध्ये असलेला सूर्युकमार यादव पुन्हा एकदा तळपला आणि मुंबईच्या धावसंख्येचा आलेख उंचावला. तसंच मुंबईचा नवखा फलंदाज विष्णू विनोदनेही अप्रतिम फलंदाजी केली. मुंबईसाठी रोहित शर्मा (२९), ईशान किशन (३१), विष्णू विनोद (३०), नेहल वढेरा (१५), टीम डेव्हिड (५) धावा करून बाद झाला. पण त्यानंतर वानखेडे मैदानात सूर्यकुमार यादवचं वादळ आलं आणि मुंबईची धावसंख्या वाऱ्याच्या वेगाप्रमाणे वाढली.
How do you hit a cover drive but get it over third man for six?
We watched SKY do it here and still can't understand. What about you? ??#IPLonJioCinema #MIvGT pic.twitter.com/kg9QU7jxuW
— JioCinema (@JioCinema) May 12, 2023
Suryakumar Yadav Sixer Shot Sachin Tendulkar Video