इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ख्रिसमस हा जगभरात साजरा केला जाणारा एक मोठा सण आहे. ख्रिश्चन धर्माचा हा सण जगात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस येशू ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. सांता क्लॉज म्हणजे नाताळ बाबा मुलांना मिठाई व भेट वस्तू देतो, असे मानले जाते. बालकांप्रमाणे मोठ्या माणसांनाही काहीतरी भेटवस्तू मिळावी असे वाटत असते. त्यातच एखाद्या कंपनीच्या बॉसने कर्मचाऱ्यांना सुखद धक्क्याद्वारे लाखोंचा बोनस दिला तर. हो असे झाले आहे. त्यामुळेच त्याची जगभरात चर्चा सुरू आहे.
प्रत्येक देशात त्या देशातील मोठ्या सणाला बोनस देण्याची परंपरा आहे. भारतात दिवाळी सणाला विविध कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. अर्थात या बोनसचे स्वरुप अनेक ठिकाणी वेगवेगळे असते. प्रत्येक कर्मचारी बोनसची वाट पाहत असतो, कोणाला किती बोनस मिळणार याची ही चर्चा सुरू होते. बोनस कमी मिळाला तर नाराजी होते आणि अधिक मिळाला तर आनंदोत्सव साजरा केला जातो.
भारतातील काही कंपन्या कर्मचाऱ्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना घसघशीत बोनस देतात असे दिसून येते . परदेशातील अशीच एक कंपनी आहे, त्यांनी कर्मचाऱ्यांना छप्पर फाडके बोनस दिला आहे. ऑस्ट्रेलियातील एका कंपनीतील महिला बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी तब्बल ८२ लाख बोनस दिला आहे. लेडी बॉसने ख्रिसमस बोनस म्हणून ८२ लाख देण्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे सदर कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षा गीना राइनहार्ट यांनी आपल्या रॉय हिल या कंपनीतील १० कर्मचाऱ्यांना ८२ लाख रुपये बोनस दिला आहे. ही कंपनी गीना यांच्या वडिलांनी स्थापन केली होती. गीना या ऑस्ट्रेलियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असून त्यांची ३४ बिलिअन डॉलर एवढी संपत्ती आहे. नाताळ सणाच्या १०ते १२ दिवस आधीच आपल्याला एक महत्त्वपूर्ण घोषणा करायची असल्याच सांगत राइनहार्ट यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एकत्र बोलावलं होते यावेळी त्यांनी बोनस जाहीर करणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांना दिली.
मात्र, एवढी मोठी घोषणा करण्यात येईल, असे कोणत्याही कर्मचाऱ्यांना वाटले नसावे. त्यामुळे ८२ लाखांचा बोनस जाहीर होताच कर्मचारी अनेक आश्चर्यचकीत झाले. त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा १० कर्मचाऱ्यांची नावे त्यांनी जाहीर केली. जाहीर झालेल्या नावांना १००,००० डॉलर म्हणजे सुमारे ८२ लाख रुपये ख्रिसमस बोनस देणार असल्याचं सांगण्यात आलं. बोनस मिळणाऱ्यापैकी एक कर्मचारी तर नुकताच तीन महिन्यांपूर्वी रुजू झाला होता.
विशेष म्हणजे राईनहार्ट यांच्या कंपनीने गेल्या १२ महिन्यांत ३.३ अरब डॉलरचा नफा कमावला आहे. यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांप्रती बॉसने आभार व्यक्त करत ही नाताळ भेट दिली आहे. अचानक एवढी मोठी रक्कम बोनस म्हणून मिळाल्याने काही कर्मचारी हैराण झाले आहेत. मात्र आता सर्वजण नात्याचा आत्तापासूनच आनंद साजरा करीत आहेत.
Surprised Bonus Employee Lakh Rupees Boss