सुरगाणा – वणी – सापुतारा महामार्गावर घागबारी जवळ अपघाती वळणावर दुचाकी अपघातग्रस्त होऊन सुरगाण्यातील दोघे युवक जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मकर संक्रांतीच्या रात्री पावणे अकरा वाजेच्या दरम्यान घडली. सुरगाणा येथील राहुल गोपाळ चौधरी (२३)रा. उंबरपाडा (सु.), भोला हिरामण बागुल (२२) व पंकज जयराम पवार (२१) हे तिघेही मोटरसायकल क्र.एम एच १५ एच एन २७११ ने वणी कडून सुरगाण्याकडे येत असतांना घागबारी जवळील अपघाती वळणावर दुचाकी वरिल ताबा सुटल्याने मार्ग सोडून झाडाला धडकल्याने तिघेही खोल खड्यात पडले. यामध्ये भोला बागुल व जयराम पवार हे दोघे तरुण अतिशय गंभीर मार लागून जखमी झाल्याने जागीच ठार झाले. तर राहुल चौधरी हा गंभीर जखमी झाला असून त्याचेवर नाशिक येथे रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मोटरसायकल स्पीड १२७ वर लॅाक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघाती वळणावर दिशा दर्शक फलक लावण्यात यावेत तसेच या वळणाचे रूंदीकरण किंवा वळण काढून रस्ता सरळ करण्याची मागणी केली जात आहे. पुढील तपास सुरगाणा पोलीस करत आहेत.मयत पंकज पवार हा नाशिक येथे तिसऱ्या वर्षातील इंजिनियरचे शिक्षण घेत होता. त्याने येथील नगरपंचातीची पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय कॉ॑ग्रेस कडून प्रभाग क्रमांक १२ मधून उमेदवारी केली असून येत्या १९ जानेवारी रोजी निवडणूक निकाल जाहीर होणार आहे. निकाल ऐकण्या आधीच काळाने त्याचेवर झडप घातली.
तातडीने १०८ अॅम्बुलन्स बोलावून तिघांना वणी येथे दाखल केले. यावेळी भोला व पंकज हे दोघेही मृत झाले असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर गंभीर जखमी झालेल्या राहुल यास नाशिक येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. मयत पंकज पवार हा नाशिक येथे तिसऱ्या वर्षातील इंजिनियरचे शिक्षण घेत होता. त्याने येथील नगरपंचातीची पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय कॉ॑ग्रेस कडून प्रभाग क्रमांक १२ मधून उमेदवारी केली असून येत्या १९ जानेवारी रोजी निवडणूक निकाल जाहीर होणार आहे. निकाल ऐकण्या आधीच काळाने त्याचेवर झडप घातली. त्याला जवळचे असे कोणीही नसून येथील दिवंगत पोलिस पाटील रामभाऊ भोये यांनीच अगदी लहानपणापासून घरी आणून सांभाळून मोठं केलं होतं. तदनंतर भोये यांचे चिरंजीव व कॉ॑ग्रेसचे शहर अध्यक्ष चंद्रकांत भोये हे पंकजचा सांभाळ करत होते. तर येथील ग्रामसेवक हिरामण बागुल यांचा भोला हा एकुलता एक मुलगा होता. तसेच गंभीर जखमी झालेला राहुल चौधरी हा येथील भाजपचे पदाधिकारी एन.डी.गावित यांचा भाचा आहे. यातील दोघा युवकांच्या आकस्मित मृत्युने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.