सुरगाणा – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात त्रिपुरा घटनेचे पडसाद उमटत असल्याने त्या पार्श्वभूमीवर सुरगाणा पोलिसांनी शहरात मॅाकड्रील करून शक्तिप्रदर्शन केले. पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर नांद्रे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत दवंगे, कैलास ठाकुर या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सुरगाणा पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी आदी माॅकड्रीलमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर पोलीस स्टेशनपासून मेनरोड, झेंडा चौक, तेलीगल्ली, होळीचौक या भागात संचलन करण्यात आले.