गुरूवार, डिसेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सुरगाणा – शासनाची देश आणि शेतकरी विरोधी धोरणे हाणून पाडा; माजी आमदार गावित

सप्टेंबर 27, 2021 | 7:10 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG20210927143112

सुरगाणा येथील होळी चौकात तर घाटमाथ्यावरील बोरगांव येथे रास्ता रोको आंदोलन
सुरगाणा – केंद्र सरकारच्या दिवाळखोर, देशबुडव्या, शेतकरी विरोधी कायद्याच्या, विषारी आणि जनतेच्या जीवघेण्या धोरणाच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या हाकेनुसार आज माजी आमदार जे.पी.गावित यांच्या नेतृत्वाखाली सुरगाणा येथील होळी चौकात तर घाटमाथ्यावरील बोरगांव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बोरगाव येथे जनार्दन भोये यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्व स्तरातून बंद पाळण्यात आला.

केंद्र सरकार मधील मोदी व शहा यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरले असून देशाची संपत्ती विकायला काढली आहे. मिलिटरीचे ४२ कारखान्यांचे खासगीकरण करणे चालविले आहे. यामुळे संपूर्ण देश खिळखिळा करण्याचे काम सुरू केले आहे. तरूणांना नोकरी देऊ शकले नाहीत. कामगारांचे २७ कायदे होते. ते गुंडाळून ठेवून चारच कायदे ठेवले आहेत. उच्च शिक्षित युवक घरी बसले आहेत. गरिब श्रीमंतांची दरी वाढविण्याचे काम या दोघांनी केले आहे.शेतकऱ्यांना कंपनींवर अवलंबून ठेवले आहे. केलेले कायदे हे भांडवलदारांच्या बाजूने तर कामगार, शेतकरी आदींच्या विरोधात असल्याची टीका यावेळी माजी आमदार यांनी केली.

गेल्या काही वर्षात केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी कामगार शेतमजूर महिला सरकारी नोकरवर्ग युवक विद्यार्थी यांच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आणि मूठभर लोकांच्या हितासाठी फायद्यासाठी देशाच्या सत्तेचा वापर करून देशाचे दिवाळे काढले आहे, देश संकटात टाकला आहे, देशातला संपूर्ण शेतकरी संकटात आहे, शेतीला भाव नाही, बागायती पिकाला भाव नाही, शिक्षण क्षेत्राकडे केन्द्र आणि राज्य सरकारने दुर्लक्ष्य केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थांचे मोठे नुकसान झाले आहे, दोन पिढ्या बरबाद झाल्या आहेत या प्रश्नांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही, हे देशातील सरकारचे दुर्दैव आहे. देशातील संबंध युवा पिढीला रोजगार आणि नोकरी ची खुप आश्वासने दिली, युवा पिढीला नोकरीची खोटी आश्वासने देऊन फसविले, देशात बेकारीची समस्या या सरकारने वाढविली आहे, त्यामूळे देशातील तरुण युवा वर्ग चुकीच्या गोष्टीकडे वळत आहे.
ग्रामीण भागांतील अनेक प्रश्न नागरिकांना सतावत आहेत प्रशासन मात्र सुस्त आहे. सुरगाणा तालुक्यातील गरीब जनतेचा सर्वात महत्वाचा प्रश्न हा वनपट्ट्याचा आहे. कायदा मंजूर होऊनही केंद्र आणि राज्य शासन वनपट्ट्याचा प्रश्न निकाली काढत नाही. वनजमिनीचा तुकडा ताब्यात देऊन स्वतंत्र सातबारा त्या व्यक्तीच्या नावे द्यावा यासाठी अनेक आंदोलने मोर्चे काढले पण सरकार जमिनीच्या प्रश्नापासून पळ काढत आहे. यासाठी परत एकदा शासनावर जोरदार आंदोलन करुण शासनाला जाब विचारावा लागणार आहे. यासाठी परत एकदा संसद आणि विधान भवनावर लाँग मार्च सारखा मोर्चा न्यावा लागणार आहे, यासाठी सर्व जनतेने जिद्दीने सहभागी व्हावे असे आवाहन केले.

तालुक्यातील जनतेला पेन्शन योजना मिळण्यास अनेक अडथळे आणले जात आहेत, रेशन कार्ड समस्या मोठी आहे,
ड घरकुल योजनेसाठी लाभधारकंना वंचीत ठेवले आहे हा जनतेला दिलेला त्रास आम्ही जणता सहन करणार नाही. वंचीत घरकूल लाभधारकांना त्वरित घरकुले मंजूर करून त्यांना तीन लाखाचे अनुदान द्या असे शासनाला ठणकावले.

येणाऱ्या काळात तालुक्यातील जनतेच्या विविध प्रश्नासंदर्भात तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याने पुढाकर घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, जनतेचे सर्व प्रश्न सोडवावेत तरच आपल्या जनतेचा विकास होईल, लहन मोठे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी युवकांनीहि पुढाकार घेईन पुढे निघावे असे आव्हान केले. यावेळी सुरगाणा पंचायत समिती सभापती इंद्रजीत गावीत , माजी जी. प. सदस्य कॉम.जनार्दन भोये , माजसभापती उत्तम कडू , माजी सभापती,सावळीराम पवार यांनी मोदी सरकारच्या दिवाळखोर आणि देशबुडव्या सरकारवर जोरदार हल्ला चढवत शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधातील निर्णयाबाबत जोरदार निषेध केला.
या बंदसाठी तालुक्यातील तीन ते चार हजार नागरीक उपस्थित होते. पंचायत समिति सदस्य कॉम विजय घांगळे, कालाबई भोये, माजी सभापती मनीषा महाले, मंदाकिनी भोये, माजी सभापती कॉम रामजी गावीत, मार्केटकमिटीउपसभापति कॉ पुंडलिकभोये, कॉम.सुरेश गवळी, राहुल आहेर धर्मेंद्र पगारिया, दीपक थोरात, राजू बाबा, अकील पठाण, योगेश थोरात, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, सुरगाणा नगर पंचायत नगराध्यक्ष, नगरसेवक , किसानसभा, जनवादीमहिला संघटना, डीवायएफआय संघटना, एसएफआय संघटना, युवा कार्यकर्ते महिला व तालुक्यातील बहुसंख्य नागरीक मोठ्या उपस्थित होते.

याप्रसंगी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या आंबा पीकांचा प्रश्न जे.पी. गावित यांनी उपस्थित केला. काही आंबा उत्पादकांना नुकसान भरपाई मिळाली. मात्र काही ठिकाणी नुकसान होऊनही आंबा उत्पादकांना नुकसान भरपाई मिळाली नाही. याला केवळ पंचनामा करणारे संबंधित तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक हेच जबाबदार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. काहींचे नुकसान झाले नाही तरी तरी भरपाई मिळाली आहे. नुकसान भरपाई न भेटलेल्यांची नवीन यादी करून उत्पादन देणाऱ्या सर्व फळपीकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी गावित यांनी केली. यासाठी तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांची संयुक्त बैठक लवकरात लवकर घेण्याची सुचना केली.

सात पैकी दोन शाळा बस बंद असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या दोन्ही बस त्वरीत सुरू करण्यात याव्यात.जोमात सुरू असलेला मटका व्यवसाय त्वरित बंद करावा, सुरगाणा – उंबरठाण – बर्डीपाडा या मुख्य महामार्गासह ईतर दुरवस्था झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, बडोदा बॅ॑केत होणारी हेळसांड थांबवावी, आदी मागण्या यावेळी उपस्थित करण्यात आल्या. याप्रसंगी नायब तहसिलदार मोरे, उपसभापती इंद्रजित गावित, कृषी अधिकारी रहाणे, गटविकास अधिकारी पाटील, बांधकाम विभागाचे उप अभियंता पवार, पोलीस निरीक्षक संदिप कोळी, सुभाष चौधरी, माजी सभापती मंदाकिनी भोये, सावळीराम पवार, रामजी चौधरी, हिरामण गावित, धर्मेंद्र पगारिया, भिका राठोड, उत्तम कडू, संजाबाई खंबाईत, वसंत बागुल, सुरेश गवळी आदींसह शेतकरी, आंबा उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सटाणा ट्रामा केअर व डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयास मिळणार नवीन रुग्णवाहिका

Next Post

नाशिक -जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तालुकानिहाय ही आहे स्थिती

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
carona

नाशिक -जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तालुकानिहाय ही आहे स्थिती

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011