सुरगाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भक्ष्याचा पाठलाग करतांना रात्रीच्या वेळी बिबट्या विहिरीत पडल्याची घटना सुरगाणा तालुक्यातील काठीपाडा गावात घडली. सकाळी महिला विहरीवर पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेल्या असता हा प्रकार लक्षात आल्याने ग्रामस्थांनी तात्काळ वनविभागाला कळविले आहे. विहरीतील पाईपाच्या आधाराने रात्रभर बिबट्याने तग धरला.
ग्रामस्थांनी दोरीच्या साहाय्याने खाट उलटी विहिरीत सोडून बिबट्याला बसायची व्यवस्था केली आहे. साधारण दीड ते दोन वर्षाचा हा बिबट्या असून त्याला विहिरी बाहेर काढण्यासाठी नाशिकहून वनविभागाचे रेस्क्यू पथक आले. या बिबट्याला बघण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी उसळली. त्यामुळे पथकाला दुहेरी कसरत करावी लागली. गर्दीवर नियंत्रण मिळवितानाच पिंजरा विहिरीत टाकूत बिबट्याला बाहेर काढण्यात आले.
कळवण तालुक्यातील नवी बेज शिवारात आठ दिवसापूर्वी कोंबड्यांची शिकार करायला गेलेला दीड वर्षाचा बिबट्या खुराड्यात अडकल्याची घटना या घडली. बिबट्याच्या डरकाळ्यांमुळे शेतकऱ्याचे लक्ष खुराड्याकडे वेधले गेले. त्यामुळे तो भयभीत झाले. त्याने तातडीने पोलिस आणि वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे रेस्क्यू पथक साधनसामग्रीसह घटनास्थळी पोहचले. त्यानंतर या बिबट्याला पकडण्याचे कार्य हाती घेण्यात आली. पथकाने सर्वप्रथम या बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन दिले. त्यानंतर हा बिबट्या बेशुद्ध झाला. त्याद्वारे बिबट्याला खुराड्यातून मोठ्या पिंजऱ्यात स्थलांतरीत करण्यात आले. कळवण तालुक्यात बिबट्या खुराड्यात अडकला तर सुरगाणा तालुक्यात बिबट्या विहिरीत पडला.
Surgana Leopard Fall Well Rescue Operation
Nashik District Rural Trible Forest Wild Animal