सुरगाणा – गुरुवार पासून कडक निर्बंध लावूनही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या काही नागरिकांवर प्रशासनाने ठोस कारवाई करत त्यांची तपासणी केली असता चार तरूण पॉझिटिव्ह आल्याने त्यांना येथील कोविड सेंटरमध्ये पाठविण्यात आले. ही कारवाई आणखी कडक केली जाणार असल्याचे तहसिलदार सचिन मराठे यांनी म्हटले आहे.
शहरात कडक निर्बंध चालू असताना देखील विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची थेट रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गुरूवारी सुरगाणा तहसिल पोलिस आणि नगरपंचायत प्रशासन यांच्या संयुक्त माध्यमातून ह्या कारवाईला सुरुवात करण्यात आली. एकीकडे व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली असली तरी नागरिकांची वर्दळ मात्र कायम सुरू असल्याने सुरगाणा तहसिल पोलिस आणि नगरपंचायत प्रशासनाने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरूवारी या कारवाईला सुरुवात झाली.एकीकडे मेडिकल सेवा वगळता सर्वच दुकाने,व्यवसाय बंद असताना नागरिकांनी वर्दळ कमी होत नसल्याचे चित्र गुरूवारी होते.त्यामुळे संचार बंदीचा उद्देशालाच हरताळ फासला गेला होता.ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर गुरुवार पोलीस आणि नगरपंचायत प्रशासन यांनी धडक कारवाई करत विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय घेतला.सुरगाणा तहसीलदार सचिन मराठे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बोडके आणि नगरपंचायत चे मुख्याधिकारी डॉ.सचिन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. विनामास्क फिरणाऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली.तर अनेकांना रॅपिड टेस्ट साठी पाठवण्यात आल्याने विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिस कारवाईमुळे चांगलीच अद्दल घडली आहे. जनता कर्फ्यु असल्याने कोणीही विनाकारण फिरताना नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
….
होम कॉरंटाईन असतांना बाहेर
दरम्यान, शहरातील एकटा रहात असलेला एक पॉझिटिव्ह रुग्ण होम कॉरंटाईन असताना सार्वजनिक टाकीवर पाणी आणण्यासाठी गेल्याने चिंतेत भर पडली आहे. याबाबत माहिती मिळताच सदर रूग्णास स्थानिक प्रशासनाने कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
***
अन्यथा कारवाईशहरात जनता कर्फ्यु हा स्वयंस्फूर्तीने पाळण्यात येत आहे.व्यावसायिकांनीही जनता कर्फ्यु ला साथ देत दुकाने बंद ठेवली आहेत.असे असताना विनाकारण कोणीही फिरू नये.अन्यथा कारवाई केली जाईल.-
निलेश बोडके, सहाय्यक पोलिस निरीक्षक, सुरगाणा
***
रॅपिड टेस्ट केली जाईलकोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने नागरिकांनी विनाकारण फिरू नये.विनाकारण फिरल्यास कारवाई करून सदर व्यक्तीची रॅपिड टेस्ट केली जाईल.दंडात्मक कारवाई देखील केली जाईल. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे –
सचिन मराठे, तहसिलदार सुरगाणा.