गुरूवार, ऑक्टोबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक-नगर मार्गे सूरत-सोलापूर हायवेची नितीन गडकरींनी केली घोषणा

ऑक्टोबर 2, 2021 | 4:23 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
nitin gadkari e1671087875955

अहमदनगर – “येत्या काळात महाराष्ट्रात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येईल. या माध्यमातून महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत देशात पहिल्या नंबरवर आणण्याचा प्रयत्न राहिल, तसेच ‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस-वे’ च्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील विकासाला गती मिळणार आहे. रोजगार वाढणार आहे.” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. यावेळी श्री. गडकरी यांनी अहमदनगर च्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या तीन रस्त्यांच्या कामांची घोषणाही केली.

अहमदनगर येथे आज ४०७५ कोटी किंमतीच्या ५२७ किलोमीटर लांबीच्या २५ महामार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पण श्री.नितिन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यसभा सदस्य शरद पवार, ग्रामविकास-कामगार मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सदाशिवराव लोखंडे, सुजय विखे पाटील, महापौर श्रीमती रोहिणी शेडगे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले पाटील, आमदार अरुणकाका जगताप, बबनराव पाचपुते, श्रीमती मोनिका राजळे, संग्राम जगताप, रोहित पवार, निलेश लंके आदी उपस्थित होते.

श्री.गडकरी म्हणाले, सुरत-नाशिक-नगर-सोलापूरमार्ग चेन्नईला जाणाऱ्या नवीन ‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस-वे’ ची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी १८० किलोमीटर आहे‌. यात महाराष्ट्रात ५० हजार कोटी खर्च केले जाणार आहेत. यातील अहमदनगर जिल्ह्यातच ८ हजार कोटी खर्च होणार आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात जेथे शक्य असेल तेथे लॉजिस्टिक पार्क, इंडस्ट्रियल क्लस्टर व ट्रांसपोर्ट नगर उभारणे शक्य आहे. त्यामूळे नगर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. येथील तरूणांच्या हाताला काम मिळेल. एक्सीस कंट्रोलने हा महामार्ग बांधत आहोत. सुरतपासून नाशिक, अहमदनगर, सोलापूर, अक्कलकोट, गुलबर्गा, यादगीर, कर्नुल आणि चेन्नई (दिल्ली-मद्रास) असा १२७० किलोमीटरचा महामार्ग असेल. सध्या याची लांबी १६०० किलोमीटर आहे. म्हणजेच या रस्त्याची महाराष्ट्रातून जाणारी ३३० किलोमीटर लांबी कमी होणार आहे. मुंबई पुण्यासह ठाणे, कोल्हापूर, सोलापूरची देखील सर्व वाहतूक कमी होईल आणि प्रदूषणही कमी होईल. हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी पर्यायाने अहमदनगर साठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास श्री.गडकरी यांनी व्यक्त केला.

अहमदनगर साठी महत्वपूर्ण ठरतील असे तळेगांव – पाटोदा (रा.म.५४८) जामखेड-सौताळा (बीड-१३५ कोटी) व कोपरगांव – सावळी विहीर-(१५० कोटी) या रस्ते कामांची घोषणा करत नितीन गडकरी म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी विमानतळ परिसराच्या बाजूला नवीन स्मार्ट सिटी वसविण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. अशी नवीन शहरे वसविल्यास स्थानिक परिसराच्या विकासाला व रोजगाराला चालना मिळते. कोणत्याही देश व राज्याचा विकास पाणी, ऊर्जा, दळणवळण व संदेशवहन या चार गोष्टींवर अवलंबून असतो. या गोष्टी असल्यावर उद्योगांचे जाळे तयार होते. पर्यायाने रोजगार वाढतो.

शेतकऱ्यांनी काळाची पावले ओळखून आपल्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. साखर कारखानादारांनी आता अधिक साखर उत्पादन न घेता इथेनॉलचा उत्पादनाकडे वळले पाहिजे. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉलचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणात प्रदुषणापासून मुक्तता मिळणार आहे.असेही गडकरी यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, अहमदनगर उड्डाणपुलाच्या जमीन अधिग्रहणासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तेव्हा प्रशासनाने लवकरात लवकर या उड्डाणपुलाचे काम मार्गी लावावे. विकासाच्या बाबतीत राजकारण करायचे नाही. याकडे माझा पहिल्यापासून कटाक्ष राहिला आहे. महाराष्ट्रात साडेतीन लाख कोटीं चे रस्ते कामे केले. एक लाख कोटींचे सिंचन कामे केली. ४० ‌हजार कोटी सिंचनाच्या अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दिले. असेही श्री.गडकरी यांनी सांगितले.

श्री.पवार म्हणाले, गडकरींच्या केंद्रीय मंत्रिपदापूर्वी ५ हजार किलोमीटर रस्ते कामे झाली होती. ते आल्यानंतर त्यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून १२ हजार किलोमीटर रस्त्यांची कामे झाली आहेत. लोकप्रतिनिधी कशाप्रकारे देशाच्या उभारणीसाठी काम करू शकतात त्याचे उत्तम उदाहरण गडकरी आहेत. अहमदनगर जिल्हा शेतीमध्ये संपन्न आहे. येथील शेतकऱ्यांनी नव तंत्रज्ञानचा वापर करत शेतीपूरक उद्योगाकडे वळले पाहिजे. साखर कारखानदारांनी इथेनॉलच्या निर्मितीवर भर देणे गरजेचे आहे.

श्री.मुश्रीफ म्हणाले, शहरातील ‘उड्डाणपूल टप्पा क्रमांक दोन’च्या कामात केंद्राने मदत करावी. पुणे-औरंगाबाद मार्गाची वाहतूक जलद गतीने व्हावी, शिर्डी बाह्यवळण रस्ता, सावळी विहीर- कोपरगांव या रस्त्यांच्या कामात श्री.गडकरी अहमदनगर जिल्ह्याला मदत करतील. अशी अपेक्षा ही मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केली.

खासदार सदाशिव लोखंडे, सुजय विखे पाटील यांनी ही आपले विचार व्यक्त केले.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरण व महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून या प्रकल्पांचे कामकाज करण्यात येणार आहे. यावेळी अहमदनगर-फलटण, अहमदनगर-जामखेड, कोपरगांव-औरंगाबाद, नांदूर ते कोल्हार आणि झगडे फाटा- कोपरगांव या राष्ट्रीय महामार्गावरील २१० किलोमीटर पर्यंत रस्त्यांच्या कामांचे लोकार्पण करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६०, ५१६/अ, ६१ व ५४८/डी यांचे भारतमाला योजनेंतर्गत दुपदरीकरण व चौपदरीकरणांच्या कामांचे तसेच केंद्रीय राखीव निधी मधून अहमदनगर जिल्ह्यात १४ अंतर्गत रस्त्यांचे दुरूस्तीकरणांच्या कामांचे भूमिपूजन यावेळी श्री.गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यात ४०७५ कोटी रूपयांच्या निधीतून ५२७ किलोमीटरच्या रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे मुख्य प्रबंधक अंनशूमली श्रीवास्तव, राजीव सिंग, मधुकर वाठोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पी.बी.भोसले, अधीक्षक अभियंता जे.डी.कुलकर्णी, एस.डी.पवार आदी अधिकारी उपस्थित होते.

गडकरी यांच्या भाषणातील महत्त्वपूर्ण मुद्दे:-*

– नगर जिल्ह्यात 70 हजार हेक्‍टर क्षेत्रावर ऊस पिकवला जातो. 23 साखर कारखाने आहेत. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे.

– संकरीत गायींची पैदास केल्यास एक गाय २ लीटर वरून २५ लीटर पर्यंत दूध देऊ शकते.

– ऊस पिकांमध्ये आंतर पीक म्हणून तेलबियांचे उत्पादन घेतले पाहिजे.

-वाहन उद्योगांनी पेट्रोल वरील अवलंबित्व कमी करून इथेनॉल वर चालणारे वाहने निर्मितीकडे वळले पाहिजे.यातून लोकांचे ५ लाख कोटी रूपये वाचतील.

– देशाला २४० लाख टन साखरेची गरज आहे. उत्पादन ३१० लाख टन होते. त्यामुळे साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती वर भर देणे गरजेचे आहे.

– भारतमाला टप्पा – २ मध्ये महाराष्ट्रातील काही रस्ते प्रकल्पांचे कामे करणार

-आतापर्यंत महाराष्ट्रातील सर्व पक्षाचा लोकप्रतिनिधींना रस्ते विकासासाठी 2 हजार कोटी रुपये दिले.

– उड्डाणपूल, रोप-वे, हायपरलूप ची कामे मोठ्या प्रमाणात करणार.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्ह्यातील १५ धरणे फुल्ल; या धरणांमधून अद्यापही सुरू आहे विसर्ग

Next Post

लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभागी व्हायचं आहे? फक्त हे करा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

MOBILE
मुख्य बातमी

दिव्यांगांसाठी खुषखबर… हे ॲप डाऊनलोड करा आणि सरकारी योजनांचा लाभ घ्या…

ऑक्टोबर 15, 2025
Rural Hospital PHC 1
महत्त्वाच्या बातम्या

अजूनही कुटुंब जिवंत आहे… लहान भावाने वाचवले मोठ्या भावाचे प्राण…

ऑक्टोबर 15, 2025
IMG 20251015 WA0053
महत्त्वाच्या बातम्या

सिंहस्थ कामांचा शुभारंभ… या रस्त्यावरील अतिक्रमणे जमीनदोस्त…

ऑक्टोबर 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
इतर

असा असेल तुमचा १६ ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या गुरुवारचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 15, 2025
maha gov logo
महत्त्वाच्या बातम्या

नांदूरमध्यमेश्वरच्या ‘त्या’ जागेच्या प्रकरणात खळबळजनक बाब समोर… तहसिलदारांसह उपअधिक्षकांचे काय होणार?

ऑक्टोबर 14, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

दिवाळीपूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय…

ऑक्टोबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या १५ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 14, 2025
महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
Next Post
lakme fashion week 1

लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभागी व्हायचं आहे? फक्त हे करा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011