सूरत: कर्मचाऱ्यांना कार-घर गिफ्ट करणारे सूरतचे हिरे व्यापारी महेश सवानी यांनी रविवारी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी त्यांचे स्वागत केले. गुजरातच्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी सवानी यांचा हा प्रवेश गुजरातसह देशात चर्चेचा विषय ठरला. सवानी हे हिरे व्यापारी बरोबरच सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही प्रसिध्द आहे. ते प्रत्येक वर्षी दिवाळीला कर्मचाऱ्यांना कार-घर गिफ्ट करतात. त्याचप्रमाणे त्यांनी आतापर्यंत अनेक मुलींची लग्न देखील लावून दिली आहेत. या सर्व कामांमुळे त्यांचे नाव देशभरात चर्चेत आहे.
मनीष सिसोदिया यांनी ट्वीट करत सवानी यांच्या प्रवेशा बद्दलची माहिती दिली. या प्रवेशानंतर त्यांनी सूरतमधील पत्रकार परिषदेत घेत सांगितले की, गुजरातमध्ये आम आदमी पार्टी चौफेर वेगाने वाढत आहे. आप गुजरातमध्ये एका मोकळ्या भूखंडासारखा आहे. ज्यावर राज्याच्या नवीन आणि आधुनिक राजकारणाचं घर बनवले जाऊ शकते. या इमारतीचा पाया मजबूत करण्यासाठी आपमध्ये महेश सवानी आले असून त्यांचे स्वागत आहे.
सवानी यांचे वडील ४० वर्षापूर्वी भावनगरमधून सूरला आले. त्यानंतर त्यांनी हिरे पॉलिश करण्याचे काम सुरु केले. ते काम हळू हळू वाढले. त्यानंतर ते प्रसिध्द हिरे व्यापारी झाले.पण, कर्मचाऱ्यांना कार-घर गिफ्ट करणारे व्यापारी म्हणून ते अधिक चर्चेत राहिले.
https://twitter.com/msisodia/status/1409065639298297857?s=20