इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आम आदमी पक्षाच्या गुजरात येथील एक आमदार हॉटेलच्या रूममध्ये दुसऱ्याच्या पत्नीसोबत आढळला आहे. मुख्य म्हणजे या आमदार महोदयांना कृष्ण्कृत्य करताना दस्तुरखुद्द त्या पत्नीच्या पतीने पकडले आहे. या घटनेने आपच्या स्वच्छ लोकप्रतिनिधींच्या प्रतिमेला तडा गेल्याची चर्चा आहे.
‘आप’च्या या आमदाराचा व्हिडिओदेखील बराच व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये आमदार भूपत भयाणी दिसून येत आहेत. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सूरतमधील एका हॉटेलमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. आम आदमी पक्षाचे आमदार एका महिलेसोबत हॉटेलच्या गेस्ट हाऊसमध्ये आले. तिथे त्यांनी रिसेप्शनवर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर ते त्या महिलेला घेऊन खोलीत आले, मात्र या महिलेचा पती मागून आल्याने या आमदारांनी तोंडावर रुमाल धरून स्वत:ची ओळख लपवली. या व्हिडीओमध्ये दिसत असलेले व्यक्ती हे आपचे आमदार भूपत भयाणी असल्याचा दावा केला जात आहे. मात्र या व्हिडीओवर आपने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालेला हा व्हिडीओ हा ८ जूनचा आहे. हा व्हिडीओ आणि महिलेसोबत हॉटेलमध्ये जाणे आणि तिथून बाहेर येण्याच्या दाव्यावर आपच्या आमदारांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भूपत भयाणी हे विसावदर मतदारसंघातील आमदार आहेत. पाटिदार समुदायाशी संबंधित भयाणी हे त्यांच्या विभागात लोकप्रिय आहेत. त्यांनी कॉंग्रेस सोडून भाजपात गेलेले आमदार हर्षद रिबाडिया यांना पराभूत केलं होतं.
व्हिडिओवरून उलटसुलट चर्चा
गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या गुजरातमध्ये ‘आप’ने स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ‘आप’ने पाच जागा जिंकल्यात. मात्र, काही दिवसांतच या पक्षाचे आमदार अडचणीत आले आहेत. पक्षाचा एक आमदार युवराज सिंह जडेजा हा सध्या तुरुंगात आहे. तर भूपती यांचा रंगेल व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महिलेसोबतच्या व्हिडीओमुळे गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या व्हिडीओवरून उलटसुलट चर्चा सुरू आहेत.