इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बिग बॅास मराठी सीझनचा विजेता अखेर सूरज चव्हाण ठरला. सूरज चव्हाण विजेता होणार याची चर्चा सोशल मीडियावर अगोदरच होती. ती आज खऱी ठरली. सूरजने घरातल्या इतर स्पर्धकांना त्याने ज्या प्रकारे टास्कमध्ये टक्कर दिली. याचेही सर्वांनी कौतुक केले. विशेष म्हणजे टॅाप ६ मधून त्याने बाजी मारली. निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनजंय पोवार, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण हे बिग बॅास मराठीचे फआयनलिस्ट होते. त्यात त्याने बाजी मारली.
सूरज मूळचा बारामतीचा असून तो टीकटॅाकमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पण, असं असलं तरीही सूरजचं वैयक्तिक आयुष्य हे फार खडतर गेलंय. सूरज लहान असतानाच त्याच्या आई – वडीलांना जगाचा निरोप घेतला. घराची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेताा आलं. सूरजला पाच बहिणी असून त्याच्या मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळा केला. बुक्कीत टेंगूळ, गुलीगत धोका अशा शब्दांमुळे आणि रिल्समुळे सूरज चांगलाच तो फेमस झाला.