अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सुरगाणा तालुक्यातील अंलगुण येथील पाझर तलाव आज सकाळी १० वाजेच्या सुमारास फुटल्याने भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर गावात पाणी घुसल्याने एकच धावपळ उडाली अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने भांडी, कपडे लता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात तीन दिवसापासून मुसळधार पाऊस होत असल्याने या भागातील नद्यांना मोठे पूर आला आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे, मुसळधार पावसामुळे अनेक लहान-मोठे बंधारे,तलाव भरून वाहू लागले आहे.