सुरगाणा – नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ (रजि.) संलग्न सुरगाणा तालुका मराठी पत्रकार संघाची द्विवार्षीक निवडणूक येथील विश्रामगृहात खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली. ही निवडणूक संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंतराव पवार व जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा निवडणूक निर्णय अधिकारी शाम खैरनार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. पंधरा पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी शाम खैरनार यांनी सुरगाणा तालुका मराठी पत्रकार संघाची पुढीलप्रमाणे कार्यकारिणी जाहीर केली. तालुका अध्यक्ष – रतन चौधरी, उपाध्यक्ष लक्ष्मण बागुल, सह उपाध्यक्ष लक्ष्मण पवार, कार्याध्यक्ष – हिरामण चौधरी, सरचिटणीस – आनंद पडवळ,. सहसरचिटणीस – रमेश अहेर, खजिनदार – भास्कर भोये, संघटक – अशोक गवळी, सहसंघटक – एकनाथ बिरारी, समन्वयक – अलकेश सुराणा, कार्यकारिणी सदस्य शुभम आहेर, वाल्मिक साळुंखे, संतोष लाडे व नसीर मनियार यांची निवड झाली. यावेळी संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंतराव पवार यांनी सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ (रजि.) संलग्न सुरगाणा तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीस नियुक्ती पत्र व शुभेच्छा संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंतराव पवार. समवेत तालुक अध्यक्ष रतन चौधरी, उपाध्यक्ष लक्ष्मण बागुल यांनी दिल्या.