सुरगाणा – येथील वार्ड क्रमांक ८ मधील नागरिकांची पाण्यासाठी होणारी गैरसोय दूर होण्यासाठी भाजपचे नगरसेवक सचिन महाले यांनी स्वखर्चातून बोअरवेल काढून दिल्याने या वार्डातील नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मोठी मदत झाली आहे. वार्ड क्रमांक ८ मधील नागरिकांना विशेषता महिलांना पाण्यासाठी दररोज धावाधाव करावी लागत होती. यामुळे वेळेचा अपव्यय व परिश्रम घडत होते. या पार्श्वभूमीवर पाणी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन भाजपचे नगरसेवक सचिन महाले यांनी या वार्डातील नागरिकांना दिले होते. त्या आश्वासनाची पुर्तता करत महाले यांनी स्वखर्चातून बोअरवेल काढून दिल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत धन्यवाद दिले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक सचिन महाले यांचेसह माजी तालुकाध्यक्ष दिनकर पिंगळे, माजी शिक्षक एस. के. चौधरी, प्रभाकर महाले, संतोष बोरसे, बाळाभाऊ दुसाने, देविदास चौधरी, सोमनाथ चव्हाण, कैलास सूर्यवंशी, प्रसाद पवार, चौधरी आदींसह नागरिक उपस्थित होते.