सुरगाणा – केंद्र सरकार कडून विविध योजनांचा निधी दिला जात असूनही तो निधी तुमच्या सारख्या सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचत नसून महाराष्ट्र सरकारने तळागाळातील जनतेच्या भल्यासाठी खर्च करावा असे प्रतिपादन केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री अर्जुन मुंडा यांनी सुरगाणा तालुक्यातील घाटमाथ्यावरील हतगड येथे आयोजित आदिवासी महोत्सवात केले.प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण व अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हतगड येथे आयोजित आदिवासी महोत्सव, खाद्यमेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षिस वितरण समारंभात केंद्रीय मंत्री मुंडा बोलत होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास सबका प्रयास और सबका विश्वास यातून देशात विविध प्रकारच्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून विकास होण्यासाठी केंद्र सरकार कडून जो निधी देण्यात आला आहे. तो तुमच्या सारख्या सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचला नाही. हर घर जल हर घर नल, उज्वला गॅस, घरकुले, शौचालय इत्यादी सारख्या महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून महाराष्ट्र पुढे नेऊया. पुढे जायचे असेल तर सर्वांनी संकल्प करा. मोदींनी आदिवासी समाजाचा विकास केला आहे. त्यांनी आदिवासी गुणगौरव सोहळा सुरू केला. जल जंगल जमीन ही आपली संपत्ती आहे. ही ओळख कायम ठेवली पाहिजे. आदिवासींची मुले अशिक्षित राहणार नाहीत. त्यांना उच्च शिक्षण मिळाले पाहिजे असा संकल्प करण्याचा संदेश दिला.
जल, जंगल, जमीन हिच खरी आदिवासीचीं ओळख – अर्जुन मुंडा
जल, जंगल, जमीन हिच खरी आदिवासीचीं ओळख आहे.मी भगवान बिरसा मुंडा यांच्या मातृभूमीतून देशातील आदिवासीचींचे प्रतिनिधित्व करीत आहे असे प्रतिपादन केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा यांनी हतगड येथील आदिवासी शेतकरी व शेतमजूर या भाजपच्या जाहीर सभेत बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारतीयांना पवार, माजी मंत्री अशोक उईके, बागलाणचे आमदार उमाजी बोरसे, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे, भाजपा जिल्हा अध्यक्ष केदा आहेर, प्रति चौधरी, संजू पाटील, अन्न सुरक्षा मानव प्राधिकरण सचिव नवी दिल्ली, मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, भाजपा आदिवासी विकास आघाडीचे सरचिटणीस एन. डी. गावित, प्रकल्प अधिकारी विकास मिना, आदिवासी क्षेत्रातील उद्योजक तुकाराम कर्डिले, कलावती चव्हाण, नवल कपूर, भाजपा तालुका अध्यक्ष रमेश थोरात, सचिन महाले, माधुरी कांगणे, सुनिल बच्छाव, ठाणे जिल्ह्यातील हेमंत सवरा, राजेंद्र गावीत, भरत गावित, किशोर पालकर, रवि अनासपुरे, भाऊ कडभाने, समीर चव्हाण, तालुकाध्यक्ष रमेश थोरात, सचिन महाले, कळवण शहर अध्यक्ष चेतन निकम, हेमंत रावले, रुपेश शिरोळे, आदि उपस्थिती होते.
यावेळी मुंडा म्हणाले की, नाशिक ही भूमी क्रांतीकारकांची तर हतगड ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या धरतीला प्रथम मी वंदन करतो. पंधरा नोव्हेंबर हा जागतिक आदिवासी गौरव दिन मोदी सरकारने सुरू केला असून आदिवासीचा खरा इतिहास या दिनाच्या निमित्ताने उजेडात येत आहे. आदिवासीचीं ओळख हि केवळ जंगलात राहतो या पुरतीच नसून स्वाभिमान, राहणीमान,आनंदी जीवन पद्धती, अमूल्य सांस्कृतिक ठेवा अशी आहे. वन जमीन, जंगल या वरील अधिकार हा आदिवासीचाच आहे. भाजप मोदी सरकारच्या काळात आदिवासी मधील कोणत्याही समाजातील मुलगा, मुलगी अशिक्षित, शिक्षणाचा पासून वंचित राहणार नाही याची काळजी केंद्र सरकारने घेतली आहे. तसेच कुपोषित, मागासलेला, रोजगार याकडे केंद्र सरकार लक्ष देत आहे. नवीन भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी शेतकरी, कामगार, आदिवासी, शेतमजूर, कारखान दार हे सर्वच एक दिलाने काम करीत आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाला कोट्यवधी रुपये यापूर्वीच दिले आहेत ते खर्च करीत नाहीत. ते खर्च करून आणखी पैशाची मागणी केली तर दिले जातील. मोदी सरकारने हर घर जल, स्वयंपाक घरगुती गॅस योजना, घरोघरी वीजपुरवठा, कोरोना काळातील लसीकरण, येत्या पंचवीस वर्षातील भारताचे नियोजन बघितले जात आहे. महाराष्ट्र सरकारने आदिवासीं करीता अनेक योजना केंद्रात पाठविल्यास त्या योजनांना मंजुरी दिली जाईल. आदिवासी समाज हा भोळा भाबडा आहे त्यांना ठगवून, लुटून काहीजण खूश होतात. तर आदिवासी हा लुटल्या गेल्यामुळे खूश होतो हि वस्तुस्थिती आहे. यामुळेच मोदी सरकारच्या सबका साथ सबका विकास सबका विश्वास या हा नारा आदिवासींनी स्वीकारला पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री भारतीतील यांनी सांगितले की, भारताने कोरोना काळात एकशे नव्वद कोटींहून अधिक लसीच्या मात्रा देशाच्या कानाकोपऱ्यात तसेच नव्वद पेक्षा जास्त देशात लस पोहचवली जात आहे. अनेकांकडून महाराष्ट्रात भाजप काहीच काम करीत नाही असे भ्रमित केले जात आहे. विरोधक म्हणतात नाशिकला काय दिले असा सवाल उपस्थित केला जातो . एक हजार दोनशे चौ-याण्णव कोटीचे पॅकेज कोरोना काळात दिले आहे. यावेळी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांचेवर त्यांनी टीकास्त्र सोडले यावेळी त्या म्हणाल्या की, आदिवासींच्या मागणी संदर्भात दिलेले पत्र हे भाजपचे आहे असे सांगितले जाते. तुम्ही आमच्या पत्राला न्याय दिला नाही तर आमचे मुंडा साहेब हे आमच्या पत्राला नक्कीच न्याय देतील. दुर्दैवाने इथे गलिच्छ राजकारण केले जात आहे.२७५-१ हा निधी अडवून ठेवला आहे. तो खर्च केला जात नाही. याचा मी निषेध करीत आहे. आदिवासी विकास मंत्री यांना आदिवासीना भेटण्यासाठी वेळ नाही. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे काम एकशे वीस किलोमीटर पेक्षा जास्त काम सुरगाणा तालुक्यात झाले आहे. यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळाले पाहिजे तसेच ते केंद्र व राज्य शासनाच्या सेवेत अधिकारी पदावर पोहोचले पाहिजेत याकरिता जिल्ह्यात सुरगाणा, पेठ, कळवण, दिंडोरी या तालुक्यात एकलव्य आदिवासी इंग्रजी निवासी शाळांकरीता एकशे दोन कोटी पेक्षा जास्त निधी दिला आहे.